BlaBlaCar : ब्लाब्ला कार व इतर खासगी ॲपच्या वाहनांवर होणार कारवाई

BlaBlaCar : ब्लाब्ला कार व इतर खासगी ॲपच्या वाहनांवर होणार कारवाई

0
BlaBlaCar : ब्लाब्ला कार व इतर खासगी ॲपच्या वाहनांवर होणार कारवाई
BlaBlaCar : ब्लाब्ला कार व इतर खासगी ॲपच्या वाहनांवर होणार कारवाई

BlaBlaCar : नगर : लांब पल्ल्याच्या वाहतुकीसाठी मोठ्या शहरांत ब्लाब्ला कार (BlaBlaCar) व इतर खासगी ॲपच्या वाहनांचा वापर केला जात आहे. या ॲपने सुचवलेला वाहन प्रवास हा स्वस्त असला तरी यातील काही वाहनांचा प्रवास नियमबाह्य ठरत असल्याचा आरोप करत पुणे (Pune) येथील प्रादेशिक परिवहन विभागाने (Transport Department) कारवाईचा बडगा उगारण्याचे ठरवले आहे. या संदर्भात पुणे येथील सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी विनायक साखरे यांनी आदेश काढला आहे.

BlaBlaCar : ब्लाब्ला कार व इतर खासगी ॲपच्या वाहनांवर होणार कारवाई
BlaBlaCar : ब्लाब्ला कार व इतर खासगी ॲपच्या वाहनांवर होणार कारवाई

अवश्य वाचा :  बीडमध्ये पोलीस कर्मचाऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

अ‍ॅपद्वारे खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर

ब्लाब्ला कार व इतर अ‍ॅपद्वारे खासगी वाहनांचा व्यावसायिक वापर करून प्रवासी वाहतूक केली जात असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे प्रादेशिक परिवहन विभागाने सांगितले आहे. तसेच या अनधिकृत प्रवासी वाहतुकीची तपासणी व त्यावर कारवाई करण्यासाठी पुणे शहरातील रस्ता सुरक्षा पथक क्रमांक १ ते ६ यांना पुढीलप्रमाणे तपासणीसाठी तैनात करण्यात येत आहे.
त्यानुसार नवले ब्रिज, चांदणी चौक, स्वारगेट, पुणे स्टेशन, हडपसर, येरवडा व नगर रोड येथे हे वाहनांची तपासणी होणार आहे.

नक्की वाचा : डॉ.व्ही.नारायणन इस्रोचे नवे प्रमुख;१४ जानेवारीला स्वीकारणार पदभार  

परिवहन विभागाच्या दिलेल्या आदेशात म्हटले आहे की (BlaBlaCar)

परिवहन विभागाने परिवहन विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिलेल्या आदेशात म्हटले आहे की, ब्लाब्ला कार व इतर अॅपद्वारे बुकिंग केलेली खासगी वाहने थांबवून त्यांची तपासणी करावी. वाहन चालकाचे नाव, वाहन क्रमांक आणि वाहन प्रकार याची नोंद ई-चलनवर करावी. वाहन चालकाकडे वाहनाचे विमा, नोंदणी प्रमाणपत्र, पियुसी, अनुज्ञप्ती, परवाना आणि योग्यता प्रमाणपत्र. प्रवाशांची यादी तयार करावी (नाव, वय, बोर्डिंग पॉइंट, ड्रॉप पॉईंट, भाडे). तपासणीसाठी ब्लाब्ला कार अथवा तत्सम अ‍ॅपद्वारे खासगी प्रवासी म्हणून बुकिंग करता येईल. पेमेंट पद्धती आणि वाहनाचा प्रवासी वाहतुकीसाठी व्यावसायिक वापर असल्याचा पुरावा गोळा करणे (ऑनलाईन व्यवहार, रसीद आदी). खासगी वाहनांचा व्यावसायिक उपयोग असल्यास ६६/१९२ (अ) अन्वये कारवाईसाठी प्रकरण नोंदवणे. आवश्यक असल्यास वाहन जप्त करणे. आवश्यक असल्यास वायुवेग पथकाने गुप्त प्रवासी बनून तपासणी करावी. प्रत्येक शुक्रवारी तपासणीचा सविस्तर अहवाल सादर करावा. अहवालामध्ये गोळा केलेले पुरावे, प्रवाशांची यादी आणि केलेल्या कारवाईचे तपशील नमूद कराव्यात, अशा सूचना आदेशातून देण्यात आलेल्या आहेत. मात्र, या आदेशानंतर पुणे येथील परिवहन विभागावर टीका सुरू झाली आहे.