Blackmailing : नगर : बीड जिल्ह्यातील माजी आमदाराचे अश्लिल व्हिडिओ क्लिप (Video Clips) व्हायरल करण्याची धमकी (Blackmailing) देत खंडणी (Extortion) मागितल्या प्रकरणी कथित पत्रकार इस्माईल दर्यानी (भैय्या बॉक्सर) याच्यासह दोन महिलांच्या विरोधात कोतवाली पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल झाला आहे. या प्रकरणामुळे जिल्ह्यात हानीट्रॅपची चर्चा सुरू झाली आहे.
व्हिडिओ क्लिप व्हायरल करण्याची धमकी
दोन महिला साथीदारांनी माजी आमदाराला तुमची अश्लिल व्हिडिओ क्लिप आमच्याकडे आहे. ती सोशल मीडियावर प्रसारित करून तुमची बदनामी करून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करू. तुमची राजकीय कारकीर्द संपवून टाकू, अशी धमकी देण्यात आली. .
अवश्य वाचा: दूध उत्पादक शेतकरी संघर्ष समितीचे अकोलेत निदर्शने
एक कोटी रुपयांच्या खंडणीची मागणी (Blackmailing)
तसेच माजी आमदाराला एक कोटी रुपयांची खंडणीची मागणी करून माजी आमदाराचे स्विय सहाय्यकाकडून कथित पत्रकारामार्फत २५ हजार रुपये घेतले, असे माजी आमदाराने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप दराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक योगिता कोकाटे या अधिक तपास करत आहेत. कोतवाली पोलिसांनी कथित पत्रकार व त्याच्या साथीदार महिलेला ताब्यात घेतले आहे. दोन्ही आरोपींना आज पोलिसांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.
पुन्हा हानीट्रॅपची चर्चा (Blackmailing)
जिल्ह्यात चार वर्षांपूर्वी हानीट्रॅप प्रकरणांची जोरदार चर्चा झाली होती. त्यानंतर हानीट्रॅपचे अनेक प्रकार उघडकीस आले. आता माजी आमदारालाच हानीट्रॅपमध्ये अडकविण्याचा प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. काही मोजक्या महिलांकडून अशा गैरप्रकारे पैसे मिळविण्याचे प्रकार वाढू लागले आहेत. राजकीय व सामाजिक दृष्ट्या मोठ्या व्यक्तींना या महिला हानीट्रॅपमध्ये अडकवून गैरमार्गाने पैसे मिळवत असल्याचे या प्रकरणाने अधोरेखित केले आहे.