Blackout Teaser Out : अभिनेता विक्रांत मेस्सीच्या ‘ब्लॅकआऊट’चा टिझर प्रदर्शित

ब्लॅकआऊट' या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

0
Blackout Teaser Out
Blackout Teaser Out

नगर : ‘१२ वी फेल’ (12th Fail) या चित्रपटामुळे अभिनेता विक्रांत मेस्सीला (Vikrant Massey) चांगलीच लोकप्रियता मिळाली. या चित्रपटातील त्याच्या अभिनयाचं अनेकांनी कौतुक केलं. आता विक्रांतच्या नव्या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. या चित्रपटाचं नाव ‘ब्लॅकआऊट’ (Blackout) असं आहे. ‘ब्लॅकआऊट’ या चित्रपटाचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. या टीझरला सध्या नेटकऱ्यांची पसंती मिळत आहे.

नक्की वाचा : ‘बिग बॉस मराठी’च्या नव्या सिझनचे होस्टिंग करणार ‘हा’ मराठमोळा अभिनेता

टीझरमध्ये नेमके काय ? (Blackout Teaser Out)

ब्लॅकआऊट या चित्रपटाच्या टीझरच्या सुरुवातीला अनिल कपूर यांचा “वक्त बदलने वाला है ” हा डायलॉग ऐकू येतो. या टीझरमध्ये विक्रांत मेस्सी हा एक गाडी चालवताना दिसत आहे. त्या गाडीची धडक दुसऱ्या गाडीला होते, त्यानंतर विक्रांतच्या गाडीमधील सर्व सामान बाहेर पडते. त्या सामानात पैसे, सोन्याचे दागिने असतात. हे पाहून विक्रांत आश्चर्यचकित होतो. त्यानंतर टीझरमध्ये पुढे मौनी रॉय आणि सुनील ग्रोवर यांची देखील झलक बघायला मिळते. सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सौरभ घाडगे आणि करण सोनावणे हे देखील ब्लॅकआऊट या चित्रपटाच्या टीझरमध्ये दिसत आहेत.

अवश्य वाचा : पोर्श अपघात प्रकरण;अल्पवयीन आरोपीच्या वडिलांसह बार मालक आणि मॅनेजरला अटक

 ब्लॅकआऊट कधी रिलीज होणार ? (Blackout Teaser Out)

ज्योती देशपांडे आणि नीरज कोठारी यांनी ब्लॅकआऊट या चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर देवांग भावसारने या चित्रपटाचे दिग्दर्शन केलं आहे. हा चित्रपट ७ जून, २०२४ रोजी जिओ सिनेमावर रिलीज होणार आहे. या चित्रपटासोबतच लवकरच विक्रांतचा ‘द साबरमती रिपोर्ट’ हा चित्रपट देखील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here