Block the way : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे

Block the way : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे

0
Block the way : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे
Block the way : शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रास्ता रोको : तनपुरे

Block the way : राहुरी : विकास कामांमध्ये अडथळे आणण्याचे काम सरकार करत आहे. त्यामुळे रस्त्यांचे काम त्वरित होणे अपेक्षित असताना ठेकेदाराकडून रस्त्याच्या कामात दिरंगाई होत असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी केले. राहुरी तालुक्यातील नगर-मनमाड रस्ता मुळा डॅम फाटा ते मुळानगर या जलसंपदा विभागाच्या अखत्यारितील रस्त्याच्या विकासाच्या कामास होत असलेल्या विलंबाकडे शासनाचे (Government) लक्ष वेधण्यासाठी आज मुळाडॅम फाटा येथे नगर मनमाड राज्य महामार्गावर रास्ता रोको (Block the way) आंदोलन करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. 

नक्की वाचा : डॉक्टरांची मोलकरीणच घरफोडीची मास्टरमाईंड

आमदार  प्राजक्त तनपुरे म्हणाले, रस्त्याच्या विकासासाठी महाविकास आघाडी सरकार असताना प्रशासकीय मान्यता दिली गेली होती. परंतु पुढील प्रक्रियेसाठी वेळकाढूपणा करण्यात आला. अखेर कार्यारंभ आदेश दिल्यानंतर देखील संबंधित ठेकेदार रस्त्याच्या कामकाजात दिरंगाई करत आहे. या असंवेदनशील, घोटाळेबाज, स्थगिती, वसुली सरकारला जाग यावी, याकरिता रास्तारोको केला.

हे देखील वाचा : नगर जिल्ह्याच्या विकासासाठी ६३० कोटींच्या आराखड्याला जिल्हा नियोजन समितीची मंजुरी

विकास कामामध्ये मुद्दाम आणण्यात येणारे अडथळे म्हणजे हे सरकारच्या ढिसाळपणाचा उत्तम नमुना आहे. या रस्त्याचे काम तातडीने करण्यात यावे. यासाठी अधिकाऱ्यांकडून लेखी स्वरुपात आश्वासन देण्याची मागणी केली आहे. तसेच या कामात कोणताही हलगर्जीपणा न करण्याचा कडक इशाराही आमदार तनपुरे यांनी दिला. आम्ही केलेल्या रास्ता रोकोमुळे सर्व सामान्यांना प्रवासा दरम्यान झालेल्या अडचणी बाबत माफी मागतो. त्यांना त्रास देण्याची माझी इच्छा नव्हती. पण विकास कामांमध्ये मुद्दाम आणले जाणारे अडथळे आधोरेखित करण्यासाठी हा निर्णय घ्यावा लागला असल्याचे आमदार तनपुरे म्हणाले. या रास्ता रोको आंदोलनास राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संतोष आघाव, माजी नगरसेवक बाळासाहेब उंडे, माजी नगरसेवक नंदू तनपुरे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष बाबासाहेब भिटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी तालुकाध्यक्ष मच्छिंद्र सोनवणे, जालींदर अडसुरे, आबासाहेब वाघमारे, बाळासाहेब लटके, ॲड. कचरु चितळकर, राजू साबळे, रवींद्र आढाव, सुरेश निमसे, बाळासाहेब खुळे, पंढरीनाथ पाटोळे, रघुनाथ उगले, बाबासाहेब सोनवणे, तुकाराम अडसुरे, त्रिंबक अडसुरे, अनिल माने, अशोक बकरे, विठ्ठल डव्हाण, रामदास माने, अशोक लांडगे, सलीम शेख, ज्ञानेश्वर बाचकर, पप्पू माळवदे आदी राष्ट्रवादीचे पदाधिकारी बहुसंख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here