Blok the way: श्रीगोंदा: अहिल्यानगर-दौंड रस्त्यावरील लोणी व्यंकनाथ येथे बुधवारी (ता.१८) ग्रामस्थांच्या वतीने पुकारण्यात आलेले रास्ता रोको (Blok the way) आंदोलन महावितरणच्या अधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर मागे घेण्यात आले. वीज पुरवठ्याचा प्रश्न आणि संबंधित अधिकाऱ्यांच्या बदलीबाबत वरिष्ठ स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याचे आश्वासन मिळाल्याने ग्रामस्थांनी मवाळ (soft) भूमिका घेतली. गेल्या अनेक दिवसांपासून लोणी व्यंकनाथ परिसरात विजेचा प्रश्न गंभीर बनला आहे. वारंवार खंडित होणारा वीज पुरवठा आणि महावितरणच्या स्थानिक कारभाराबाबत ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप होता.
अवश्य वाचा- वीजपुरवठा पूर्ववत करण्याची मागणी; शेतकऱ्यांचा आंदोलनाचा इशारा
महावितरणच्या अधिकाऱ्यांची ग्रामस्थांशी चर्चा (Blok the way)
या संदर्भात तक्रार करूनही तोडगा निघत नसल्याने, विजेचा विस्कळीतपणा आणि जबाबदार अधिकाऱ्यांची बदली या दोन प्रमुख मागण्यांसाठी ग्रामस्थांनी आज अहिल्यानगर-दौंड महामार्गावर आंदोलनाचा इशारा दिला होता. बुधवारी सकाळी आंदोलनाला सुरुवात होण्याच्या आगोदर परिस्थितीचे गांभीर्य ओळखून महावितरणच्या अधिकाऱ्यांनी ग्रामस्थांशी चर्चा करत, “वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी तांत्रिक कामे प्रगतीपथावर आहेत. तसेच, संबंधित अधिकाऱ्यांच्या बदली संदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला असून त्याचा पाठपुरावा सुरू आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनावर विश्वास ठेवून आणि प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी ग्रामस्थांनी आपले आंदोलन स्थगित करण्याचा निर्णय घेतला.



