Blood donation camp : नगर : जिल्ह्याच्या दक्षिण भागात कै.भावेश सोलंकी यांच्या स्मरणार्थ अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे (AIMRA)महारक्तदान शिबिर (Blood donation camp) घेण्यात आले. या शिबिरांतून तब्बल ३१२४ रक्तपिशव्यांचे (Blood bags) संकलन करण्यात आले. या शिबिराची सध्या देशभर चर्चा होत आहे.
नक्की वाचा: ‘या’ राज्यात आता खासगी नोकऱ्यांमध्ये १०० टक्के आरक्षण
अनेक सामाजिक संघटनांचे सहकार्य
या महारक्तदान शिबिरासाठी अहमदनगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनला संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशन, ‘आय लव्ह नगर’, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन व इंदू पॅव्हलिअन सह अनेक सामाजिक संघटनांनी सहकार्य केले. सुरुवातीला नगर जिल्ह्यातील दक्षिण भागात असलेल्या काही तालुक्यांच्या ठिकाणी रक्त संकलनासाठी शिबिरे झाली. त्यानंतर मंगळवारी (दि. १६) सकाळी ७ ते सायंकाळी ८ या कालावधीत नगर शहरातील नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स् येथे भव्य महारक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
अवश्य वाचा: नगरमध्ये नरेंद्रजी फिरोदिया अखिल भारतीय खुली बुद्धिबळ स्पर्धा; देशभरातील खेळाडूंचा राहणार सहभाग
मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन (Blood donation camp)
या शिबिराचे उद्घाटन आमदार संग्रामभैया जगताप व जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांच्या हस्ते झाले. यावेळी महाराष्ट्र मोबाईल रिटेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित जगताप, जिल्हाध्यक्ष अजित पवार, माजी उपमहापौर गणेश भोसले, अविनाश घुले, प्रा. माणिक विधाते, संजय चोपडा, विकीशेठ जगताप, गिरीश अग्रवाल, कमलेश भिंगारवाला, यश मेहता, रितेश सोनीमंडलेचा, सतीश लोढा, सुदाम वाडेकर, श्रीपाल ओहरा, माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे, दगडू मामा पवार, संभाजी पवार, संजय जाधव, अमित बुरा, गोरख पडोळे, अतुल रच्चा, मनीष चोपडा, संतोष बलदोटा, साजिद खान, हिराशेठ खूबचंदानी, प्रीतम तोडकर, राकेश सोनीमंडलेचा,मनोज बरलोटा आदींसह असोसिएशनचे पदाधिकारी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सुमारे पाच हजारपेक्षाही जास्त नागरिकांनी या रक्तदान शिबिराला भेट दिली. मात्र वैद्यकीय कारणांमुळे रक्तपिशव्यांचे संकलन कमी झाले. यापूर्वी नगर जिल्ह्यात एवढ्या मोठ्या प्रमाणात रक्त संकलन झाले नव्हते. त्यामुळे हे रक्तदान शिबिर जिल्ह्यासह देशभरात चर्चेचा विषय ठरले आहे. रक्तदात्यांना आयोजकांतर्फे प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. रक्तदान केलेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावर गौरवपूर्ण आनंद दिसत होता.