Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन

Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन

0
Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन
Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन

Blood Donation camp : नगर : रक्तदानाची ही चळवळ समाजात खोलवर रुजविण्यासाठी आणि गरजू रुग्णांना (Patient) मोठ्या प्रमाणावर रक्त उपलब्ध करून देण्यासाठी अहिल्यानगर मोबाईल रिटेलर्स असोसिएशनतर्फे (AMRA) जिल्हास्तरीय महा रक्तदान शिबिराचे (Blood Donation camp) आयोजन रविवारी (ता. २०) सकाळी ७ ते रात्री ९ या वेळेत अहिल्यानगर शहरातील नवीन टिळक रस्त्यावरील नंदनवन लॉन्स येथे करण्यात आले आहे.

Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन
Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन

कै. भावेशभाई सोलंकी यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजन

हे शिबिर कै. भावेशभाई सोलंकी (सेक्रेटरी, ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन) यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ आयोजित करण्यात येत आहे. यंदा या उपक्रमाचे चौथे वर्ष आहे. याला संग्रामभैय्या जगताप सोशल फाउंडेशन, I Love नगर, आणि ऑल इंडिया मोबाईल रिटेलर्स असोसिएशन यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. जिल्ह्यातील १० प्रमुख रक्तपेढ्यांची पथके पूर्ण तयारीसह रक्त संकलनासाठी सज्ज आहेत. 

Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन
Blood Donation camp : रविवारी अहिल्यानगरमध्ये महा रक्तदान शिबिराचे आयोजन

यावेळी आमदार संग्राम जगताप म्हणाले, (Blood Donation camp)

रक्तदान ही काळाची गरज आहे. एक पिशवी रक्त एखाद्या रुग्णासाठी आयुष्य देऊ शकते. २०२४ मध्ये विक्रमी रक्तसंकलन करणाऱ्या या उपक्रमाचा यंदाचा उद्देश अधिक व्यापक आहे. यंदा फक्त अहिल्यानगरपुरते मर्यादित न राहता, तालुका पातळीवरही तब्बल १२ तालुक्यांमध्ये महा रक्तदान शिबिरांचे आयोजन AMRA च्या माध्यमातून करण्यात आले आहे, ही खरोखरच गौरवाची बाब आहे.

नरेंद्र फिरोदिया यांनी सांगितले, (Blood Donation camp)

अन्नदान श्रेष्ठ, पण रक्तदान सर्वश्रेष्ठ! हे केवळ दान नसून माणुसकीचा खरा अर्थ आहे. समाजासाठी आणि गरजूंसाठी आपण सगळ्यांनी मिळून हे पवित्र कार्य हाती घेतले पाहिजे. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी कोअर कमिटी सदस्य अमित बुरा, रितेश सोनीमंडलेचा, साजीद खान, प्रितम तोडकर, राकेश सोनीमंडलेचा, हिराशेठ खूबचंदानी, मनोज बरलोटा, संतोष बलदोटा, गोरख पडोळे, मनिष चोपडा आणि अतुल रच्चा आदी कोअर कमिटी सदस्यांनी विशेष मेहनत घेतली आहे.

 हा उपक्रम केवळ रक्तदान नाही, तर माणुसकीला जोडणारा एक सशक्त दुवा आहे. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी सहभागी होऊन या ऐतिहासिक शिबिराचा भाग व्हावा, असे आवाहन AIMRA महाराष्ट्राचे अध्यक्ष अजित जगताप आणि AMRA अहिल्यानगरचे अध्यक्ष अजित पवार यांनी केले आहे.