Board Exam:मोठी बातमी!बारावीची ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा

0
Board Exam:मोठी बातमी!बारावीची ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा
Board Exam:मोठी बातमी!बारावीची ११ फेब्रुवारी तर दहावीची २१ फेब्रुवारीपासून बोर्डाची परीक्षा

नगर : दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची बोर्ड (HSC Board Exam) परीक्षा ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा (SSC Board Exam) २१ फेब्रुवारीपासून सुरु करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतला आहे. परीक्षेची सुरवात त्याच तारखेला होणार आहे, मात्र काही विषयांचे पेपर स्थानिक सुट्टीच्या दिवशी किंवा ‘सीबीएसई’च्या पेपरवेळी आहेत का, याची पडताळणी केली जात आहे. त्यानंतर संपूर्ण विषयांचे वेळापत्रक जाहीर होईल, असे बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.

नक्की वाचा : ‘एका जातीवर निवडणूक लढवता येणार नाही’- मनोज जरांगे

१० दिवस अगोदर परीक्षा घेण्याचा महामंडळाचा निर्णय (Board Exam)

बारावीची परीक्षा झाल्यानंतर विद्यार्थ्यांना जेईई, नीट परीक्षेची तयारी करता येणार आहे. यानंतर अकरावीच्या विद्यार्थ्यांची प्रवेश प्रक्रिया देखील वेळेत सुरु करता येणार आहे. याशिवाय अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची पुरवणी परीक्षा देखील वेळेत घेता येईल आणि त्या विद्यार्थ्यांना पुढील प्रवेश देखील मिळणे सोयीचे होणार आहे. श्रेणी सुधारसाठी देखील विद्यार्थ्यांला लवकर संधी मिळेल व पुढील प्रवेश त्यांचाही सोयीस्कर होईल. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने आगामी परीक्षा पूर्वीपेक्षा १० दिवस अगोदर घेण्याचा निर्णय घेतला आहे.

अवश्य वाचा : सणासुदीत सोनं-चांदी महागलं! जाणून घ्या आजचे दर   

१५ दिवसांत बोर्डाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर होणार (Board Exam)

बोर्डाने जाहीर केलेल्या तात्पुरत्या वेळापत्रकावर विद्यार्थी, पालकांच्या हरकती, सूचना मागविण्यात आल्या होत्या. त्यावर केवळ ४० हरकती तथा सूचना बोर्डाला प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे बोर्डाने तेच वेळापत्रक अंतिम करण्याचा निर्णय घेतला आहे. विभागीय मंडळांकडून त्यासंबंधीची माहिती मागविण्यात आली असून पुढील १५ दिवसांत बोर्डाकडून अंतिम वेळापत्रक जाहीर केले जाईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here