नगर : बॉलिवूड अभिनेता बॉबी देओलच्या अॅनिमल मधील अभिनयाने सर्वांची मने जिंकली होती. लवकरच तो एका नव्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘हरी हरा वीरा मल्लू’ (Hari Hara Veera Mallu) असून या सिनेमाचा हिंदी टीझर रिलीज (Teaser Relese) झाला आहे. या चित्रपटात बॉबी देओल दिल्लीच्या सुलतानच्या भूमिकेत दिसणार आहे.
नक्की वाचा : ‘पुष्पा २’मधील पहिलं गाणं रिलीज,अल्लू अर्जुनच्या हुक स्टेपची चाहत्यांना भुरळ
पवन कल्याण आणि बॉबी देओल दमदार अभिनय (Bobby Deol)
निर्मात्यांनी टीझरमध्ये पवन कल्याण उर्फ हरी हरा वीरा मल्लूच्या व्यक्तिरेखेचे वर्णन ‘एक योद्धा’ म्हणून केलं आहे. हा युद्धा गरीब शोषितांच्या न्यायासाठी लढतो’. दरम्यान या चित्रपटातील संगीत एमएम कीरावानी यांनी दिले आहे. या चित्रपटात पवन कल्याण आणि बॉबी देओल या दोन्ही कलाकारांचा अभिनय दमदार दिसत आहे. दोघांची देहबोली त्यांच्या व्यक्तीरेखेला साजेशी आहे. या चित्रपटात पवन कल्याणसह निधी अग्रवाल, बॉबी देओल, सुनील, नोरा फतेही आणि इतर अनेक कलाकार मुख्य भूमिकेत आहेत.
अवश्य वाचा : पंजाब किंग्जचा दणदणीत विजय;चेन्नईचा ७ विकेट्सने पराभव
दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी यांनी केलं चित्रपटाचं दिग्दर्शन (Bobby Deol)
हरि हर वीरा मल्लू या चित्रपटाचं दिग्दर्शन दिग्दर्शक क्रिश जगरलामुडी यांनी केलं आहे. त्यांनी याआधीच कांचे, गौतमीपुत्र सातकर्णी आणि मणिकर्णिका यांसारखे ब्लॉकबस्टर सिनेमांचे दिग्दर्शन केलं आहे. हरि हर वीरा मल्लू हा चित्रपट २०२४ च्या अखेरीस प्रदर्शित होणार असल्याचे निर्मात्यांनी जाहीर केलंय.