Viral Girl Monalisa:सुंदर डोळ्यांच्या व्हायरल मोनालिसाला बॉलिवूडमधून ऑफर

0
Viral Girl Monalisa:सुंदर डोळ्यांच्या व्हायरल मोनालिसाला बॉलिवूडमधून ऑफर
Viral Girl Monalisa:सुंदर डोळ्यांच्या व्हायरल मोनालिसाला बॉलिवूडमधून ऑफर

Viral Girl Monalisa : कुंभमेळ्यात रुद्राक्षाची माळा विकणारी मोनालिसा (Monalisa Viral Girl) ही सुंदर डोळ्यांची तरुणी गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चेत आहेत. तिचे अनेक व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. आता याच मोनालिसाला बॉलिवुडमध्ये थेट अभिनेत्री (Bollywood Offer) बनण्याची संधी चालून आली आहे. तिला मोठ्या दिग्दर्शकाने हिरोईन बनण्याची थेट ऑफर दिली आहे.

नक्की वाचा :  ‘पालकमंत्रीपदासाठी हट्ट करणे म्हणजे मंत्र्यांचा हावरटपणा’ -एकनाथ खडसे   

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांच्याकडून मोनालिसाला ऑफर (Viral Girl Monalisa)

दिग्दर्शक सनोज मिश्रा यांनी मोनालिसाला थेट चित्रपटात काम करण्याची ऑफर दिली आहे. ‘द डायरी ऑफ मणिूपर’ या चित्रपटात ती एका निवृत्त सैन्याधिकाऱ्याच्या मुलीची भूमिका करणार आहे. शूटिंग चालू होण्याआधी तीन महिने मुंबईत तिला अभिनयाचे धडे दिले जाणार आहेत. विशेष म्हणजे तिच्या कुटुंबीयांनीही तिला चित्रपटात काम करण्यास परवानगी दिलेली आहे. त्यामुळे आता सोशल मीडियावर व्हायरल झालेली ही सुंदर डोळ्यांची मोनालिसा आता अभिनेत्री म्हणून चित्रपटात दिसेल.

अवश्य वाचा :मराठ्यांना हाल हाल करुन मारणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी नाही’- मनोज जरांगे

व्हायरल झाल्याने माळा विकण्यास अडचण (Viral Girl Monalisa)

कुंभमेळ्यात मोनालिसा नावाची ही तरुणी वेगवेगळ्या प्रकारची रुद्राक्षांची माळा विकत होती. तिचे कुठेही दुकान नव्हते. ती उन्हातान्हात तिचा व्यवसाय करत होती. मात्र अचानक इंटरनेटवर तिचा व्हिडीओ आला. या व्हिडीओत तिचे सुंदर डोळे दाखवण्यात आले होते. त्यामुळे ही तरुणी सोशल मीडियावर व्हायरल झाली. त्यानंतर मात्र प्रसिद्धी मिळाल्यानंतर तिच्या अडचणी चांगल्याच वाढल्या. प्रत्येकजण तिच्यासोबत फोटो काढण्यासाठी धडपडत होता. म्हणूनच तिला तिचा व्यवसाय करण्यास अडचणी येत होत्या. विशेष म्हणजे या प्रसिद्धीला ती देखील कंटाळली होती. परिणामी तिने महाकुंभ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. सध्या ती खरगोन जिल्ह्यातील तिच्या महेश्वर गावात पोहोचली आहे. माझी प्रकृती बिघडली असून लवकरच मी महाकुंभात परतेन असं तिनं सांगितलं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here