Book publishing : प्रदीप मुखर्जी लिखित ‘परमात्मांचा संदेश’ पुस्तकाचे रविवारी होणार प्रकाशन

Book publishing : प्रदीप मुखर्जी लिखित 'परमात्मांचा संदेश' पुस्तकाचे रविवारी होणार प्रकाशन

0
Book publishing

Book publishing : नगर : अध्यात्मिक मार्गदर्शक प्रदीप मुखर्जी (Pradeep Mukherjee) लिखित मॅसेज फ्रॉम गॉड (Message From God) या प्रसिद्ध इंग्रजी पुस्तकाचा मराठी अनुवाद परमात्मांचा संदेश पुस्तक रुपात तयार करण्यात आला आहे. अलख गॉड फाऊंडेशन तर्फे हा पुस्तक प्रकाशन सोहळा रविवारी (ता. ८) सकाळी १० वाजता नगर शहरातील यशवंतराव चव्हाण (Yashwantrao Chavan) सहकार सभागृहात होणार आहे. या अनुवादीत पुस्तकाचे प्रकाशन भगवतीच्या प्रेमळ ऊर्जेचा वर्षाव करणाऱ्या फाल्गुनी पाठक व परमात्मांचे संदेशवाहक प्रदीप मुखर्जी यांच्या उपस्थितीत होईल.

अवश्य वाचा : आमदार थोरात यांचा “उत्कृष्ट संसदपटू” पुरस्काराने गौरव

यांची राहणार उपस्थिती

पुस्तक प्रकाशन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र राज्य सरकारच्या आदर्श गाव समितीचे कार्यकारी संचालक पोपटराव पवार व उद्योजक नरेंद्र फिरोदिया यांची उपस्थिती राहणार आहे. तरी नगरकरांनी मोठ्या संख्येत या कार्यक्रमात उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. अलख गॉड फाऊंडेशन आयोजित नगरकरांसाठी या अध्यात्मिक पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.

नक्की वाचा : महापालिका कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू

मुखर्जी हे सोमवारी पुणे येथे उपस्थितांशी साधणार संवाद (Book publishing)

Book publishing

प्रदीप मुखर्जी हे सोमवारी (ता. ९) सकाळी १० वाजता पुणे येथील नवी पेठेत असलेल्या एस.एम. जोशी सभागृहात उपस्थितांशी संवाद साधणार आहेत. ‘एक संवाद… प्रदीप सरांशी’ या शिर्षकाखाली हा कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात प्रदीप मुखर्जी अध्यात्मिक मार्गदर्शन करतील.