Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम

Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम

0
Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम
Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम

Book Reading : नगर तालुका : महाराष्ट्र (Maharashtra) राज्याचे विभाग ग्रंथालय संचालनालय, अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व कामरगाव इंग्लिश स्कूल तर्फे नववर्षाच्या मुहूर्तावर वाचनसंस्कृतीला (Book Reading) चालना देण्यासाठी ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ (wachan sankalp maharashtracha) हा उपक्रम कामरगाव येथील कामक्षा माता सार्वजनिक वाचनालयात राबविण्यात आला. या उपक्रमाची जिल्हाभर चर्चा होत आहे.

Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम
Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम

नक्की वाचा : मोठी बातमी!संतोष देशमुख हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना अटक

विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी यासाठी प्रयत्न

आधुनिक मोबाईल संस्कृतीत वाचन कमी होत चालल्याची ओरड नेहमीच सर्वजण करत असतात. मात्र, वाचन संस्कृती वाढीस लागावी यासाठी अहिल्यानगर तालुक्यातील कामरगाव येथे नववर्षाचा मुहूर्त साधत प्रत्यक्ष प्रयत्न झालेले दिसून आले. शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची आवड निर्माण व्हावी या दृष्टीने शालेय विद्यार्थी व ग्रंथालयातील पुस्तकांची भेट घडविण्याचा अनोखा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमात ग्रंथ प्रदर्शनाचे उद्घाटन कामरगाव इंग्लिश स्कूल कामरगावचे मुख्याध्यापक नामदेव जठार यांच्या हस्ते बुधवारी (ता. १) करण्यात आले. या प्रसंगी ज्येष्ठ शिक्षक जालिंदर वेताळ व इयत्ता सातवीचे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते. ग्रंथ प्रदर्शन, वाचन संवाद, पुस्तक वाचन असे उपक्रम वाचनालयात राबविण्यात आले. हा उपक्रम १५ जानेवारीपर्यंत राबविला जाणार आहे. या उपक्रमात सुरुवातीला इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला. विद्यार्थ्यांनी दोन तास उत्कृष्ट वाचन केले. पुस्तकांविषयी वाचन, लेखन, पुस्तक परिचय या बाबत तसेच शासनाच्या उपक्रमाबद्दल जालिंदर वेताळ यांनी उपयुक्त माहिती विद्यार्थ्यांना दिली.

Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम
Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम

अवश्य वाचा : चीनमध्ये ह्युमन मेटापन्यूमो व्हायरसचा हाहाकार; भारताला धोका?

विद्यार्थी व पुस्तकांची भेट घडविण्याचा अनोखा उपक्रम (Book Reading)

या उपक्रमासाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक नामदेव जठार, शिक्षक जालिंदर वेताळ, नामदेव जठार, महेश गोंगे, कमल भुजबळ, भारत कांबळे, जालिंदर वेताळ, वैशाली फराटे, चैताली जपे, मीरा कातोरे, शुभांगी जठार, अमृता गायके, अजिंक्य झेंडे यांच्यासह सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहकार्य करीत आहेत. कार्यक्रम यशस्वीतेसाठी वाचनालयाच्या ग्रंथपाल पल्लवी वेताळ व सहाय्यक यश वेताळ हे परिश्रम घेत आहेत.

Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम
Book Reading : पुस्तक वाचन, लेखणीतून विद्यार्थी प्रेरित; कामरगाव इंग्लिश स्कूलचा उपक्रम