Books : नगर : एक वाचलेले पुस्तक (Books) आपल्याला जगण्याचे महत्व सांगते. त्यामुळे युवकांनी आपले दैनंदिन अभ्यासक्रमाच्या पुस्तकांबरोबर अवांतर पुस्तकाच्या वाचनाचा समावेश केला पाहिजे, असे प्रतिपादन मराठा विद्या प्रसारक मंडळाचे (Maratha Vidya Prasarak Mandal) सहसचिव जयंत वाघ (Jayant Wagh) यांनी केले.
नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा
जयंत वाघ यांच्या हस्ते प्रदर्शनास प्रारंभ
ते जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व श्रीरामपुष्प सार्वजनिक वाचनालय अहिल्यानगर यांच्या मार्फत आयोजित वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमांतर्गत फिरते ग्रंथ प्रदर्शनाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते. जयंत वाघ यांच्या हस्ते फीत कापून व हिरवा झेंडा दाखवून या प्रदर्शनास प्रारंभ झाला. यावेळी प्रमुख अतिथी महाराष्ट्र साहित्य परिषद नगर शाखेचे शाखाध्यक्ष किशोर मरकड, नाशिक विभागाचे सहाय्यक ग्रंथालय संचालक सचिन जोपुळे, यावेळी या गणेश निमसे, डॉ. मच्छिंद्र मालुंजकर, ग्रंथमित्र अमोल इथापे, लक्ष्मण सोनाळे, ऑडिटर संतोष वाडेकर, ॲड. अजिनाथ जायभाये, संदीप नन्नवरे, ऋषिकेश जायभाय आदींसह वाचक, सभासद, विद्यार्थी उपस्थित होते.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
किशोर मरकड म्हणाले की (Books)
जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात २७ हजार पुस्तके उपलब्ध केली आहेत. दुर्मिळ ग्रंथ ते आजपर्यंतचे लेखकांचे साहित्य यामध्ये उपलब्ध असून फक्त १०० रुपयांत दोन वर्षासाठी आपल्याला या ग्रंथालयाचे सभासद होता येते. इतक्या कमी खर्चामध्ये शासनाने आपल्याला अमूल्य ठेवा उपलब्ध करून दिला आहे. त्याचा सर्व वाचक रसिकांनी व युवकांनी लाभ घ्यावा व वाचन संस्कृतीला बळ द्यावे.
अध्यक्षीय भाषणातून बोलताना सचिन जोपुळे म्हणाले की, मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला असल्यामुळे आता भाषेणे उंची गाठले आहे.त्यामुळे मराठी भाषा अधिक समृद्ध करणे हे प्रत्येकाचे काम आहे. यातून ग्रंथालय संचालनालयामार्फत वेळोवेळी विविध उपक्रम राबवले जातात. शहरापासून ग्रामीण भागापर्यंत ग्रंथालय स्थापन झाली आहेत त्याचा जरूर लाभ घेतला पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
यामध्ये न्यू आर्ट्स कॉलेजच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागातील मुलांनी सहभाग घेतला होता सदरत फिरते ग्रंथ प्रदर्शन परिसरातील विविध कॉलेजमध्ये जाऊन वाचनाविषयी जनजागृती केली व सभासद नोंदणी केली . या प्रदर्शनाने प्रेमराज सारडा महाविद्यालय,न्युज आर्ट कॉमर्स एण्ड सायन्स, कॉलेज लॉ कॉलेज, रेसिडेंशीयल हायस्कुल व ज्युनिअर कॉलेज, राधाबाई काळे महिला महाविद्यालय आदी महाविद्यालयांना भेट देऊ वाचन विषयक जागृती केली. या प्रदर्शनास विद्यार्थी प्राध्यापक यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. यासाठी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व श्रीरामपुष्प सार्वजनिक वाचनालयाच्या कर्मचारी वृंद यांनी विशेष परिश्रम घेतले. जिल्हा ग्रंथालय निरीक्षक रामदास शिंदे यांनी प्रास्तविक केले. शैलेश घेगडमल यांनी आभार मानले.