Bopdev Ghat Incident: पुण्यातील बोपदेव घाटात (Bopdev Ghat) रात्री आपल्या मित्रासोबत फिरण्यासाठी गेलेल्या एका २१ वर्षीय तरुणीवर तिघांनी सामूहिक अत्याचार (Mass atrocities)केल्याची घटना घडली होती. या घटनेतील तीन आरोपी फरार होते, घटनेची सखोल चौकशी सुरु होती. अखेर पोलिसांच्या हाती मोठे यश लागलय. याप्रकरणी तीन संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात (Arrested) घेतलं आहे.
नक्की वाचा : नाशिकच्या आर्टिलरी सेंटरमध्ये तोफगोळ्याचा भीषण स्फोट;दोन अग्निवीरांचा मृत्यू
लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जण ताब्यात (Bopdev Ghat Incident)
मिळालेल्या माहितीनुसार, बोपदेव घाटामध्ये २१ वर्षीय तरूणीवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यातील एका संशयित आरोपीला पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलय. तर इतर दोन आरोपींना नागपुरातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्यांची सखोल चौकशी सुरु आहे. या प्रकरणी अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही, अशी माहिती पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी दिली.
अवश्य वाचा : प्रथमेश परबच्या आगामी ‘हुक्की’ चित्रपटाचे मोशन पोस्टर प्रदर्शित
पोलिसांनी तयार केली ६० जणांची टीम (Bopdev Ghat Incident)
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी ६० टीम पोलिसांनी तयार केल्या होत्या.मात्र घटनेला नऊ दिवस होऊनही आरोपी मोकाट असल्याने पुणे पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत होते. त्यामुळे सगळीकडून या घटनेचा आणि पोलिसांच्या तपासावर संताप व्यक्त केला जात होता. त्यामुळे आरोपींचे स्केच तयार करण्यात आले होते. शिवाय आरोपीची माहिती देणाऱ्याला १० लाखाचं बक्षीस जाहीर करण्यात आलं होतं. आतापर्यंत रेकॉर्डवरील ४०० गुन्हेगारांची झाडाझडती घेण्यात आली आहे. या प्रकरणातील संशयित आरोपीचे स्केच कोंढवा पोलीस स्टेशनने प्रसिध्द केले होते. याबाबत काही माहिती मिळाल्यास खालील त्वरित संपर्क साधावा,असे आवाहन पोलिसांनी केले होते.