Boycott of voting : श्रीरामपूर जिल्हा करा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; शिवप्रहारचा इशारा

Boycott of voting : श्रीरामपूर जिल्हा करा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; शिवप्रहारचा इशारा 

0
Boycott of voting : श्रीरामपूर जिल्हा करा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; शिवप्रहारचा इशारा 
Boycott of voting : श्रीरामपूर जिल्हा करा, अन्यथा मतदानावर बहिष्कार टाकू; शिवप्रहारचा इशारा 

Boycott of voting : श्रीरामपूर : सरकार आमच्या मागण्यांची दखल घेणार नसेल तसेच आचारसंहितेआधी (Code of Conduct) ठोस कृतीशील कार्यवाही करणार नसेल, तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर (Assembly Elections) सर्व व्यापारी बांधव, श्रीरामपूर जिल्हा कृती समिती सदस्य व शिवप्रहार संघटना (Shivprahar Sanghatna) विधानसभा निवडणुकीच्या मतदानावर बहिष्कार (Boycott of voting) टाकण्यात येईल, असे शिवप्रहारप्रमुख, माजी पीएसआय सुरज आगे यांनी स्पष्ट केले आहे.

नक्की वाचा: शिर्डी विमानतळाच्या नवीन इमारतीचे पंतप्रधानांच्या हस्ते भूमिपूजन

“श्रीरामपूर जिल्हा” व्हावा, या मागणीकरता साखळी उपोषण

जिल्हा कृती समिती व “शिवप्रहार”च्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौकातील शिवस्मारकासह “श्रीरामपूर जिल्हा” व्हावा, या मागणी करताच्या साखळी उपोषण आंदोलनाचा ५६ वा दिवस आहे. श्रीरामपूर शहरातील वार्ड ०७, बेलापूररोड, बजरंगनगर या ठिकाणी चालू असलेल्या या आंदोलनाला एक महिना पूर्ण झाल्यानंतर मुंडन आंदोलन करण्यात आले. ४० दिवस पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्री/उपमुख्यमंत्र्यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आले.

अवश्य वाचा: नगर जिल्ह्यात यलो अलर्ट जाहीर

५० दिवस झाल्यावर काळ्या फिती बांधून निषेध (Boycott of voting)

५० दिवस झाल्यावर काळ्या फिती बांधून निषेध करण्यात आला. श्रीरामपूरसह नगर जिल्ह्याच्या इतिहासात ५६ दिवस इतक्या दीर्घकालीन आंदोलन झाले नाही. तरीदेखील जर अजूनही सरकार दखल घेणार नसेल, आचारसंहितेआधी सरकार मागण्यांबाबत ठोस कृतीशील कार्यवाही करणार नसेल तर येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे शिवप्रहारप्रमुख सुरज आगे यांनी स्पष्ट केले.