Brakes Fail : कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर

Brakes Fail : कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर

0
Brakes Fail : कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर
Brakes Fail : कोपरगाव बसस्थानकात थरार; ब्रेक फेल झाल्याने बस चढली थेट फलाटावर

Brakes Fail : कोपरगाव: कोपरगाव बस स्थानकावर (Kopargaon Bus Stand) आज शनिवारी (ता.७) दुपारी एक भीषण दुर्घटना थोडक्यात टळली. कान्हेगाव वारी मार्गावर जाणाऱ्या एसटी बसचे अचानक ब्रेक निकामी (Brakes Fail) झाल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस थेट फलाट क्रमांक पाचवर चढल्याची धक्कादायक घटना घडली. सुदैवाने या अपघातात (Accident) कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र एका प्रवाशाला दुखापत झाली आहे.

अवश्य वाचा: अहिल्यानगर–पुणे रेल्वे डबल लाईनचा डीपीआर पूर्ण: खासदार लंके

मोठा अनर्थ टळला

मिळालेल्या माहितीनुसार, कोपरगाव–कान्हेगाव वारी ही बस बस स्थानकात येत असताना अचानक ब्रेक फेल झाले. चालकाने प्रसंगावधान राखत बस नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला. मात्र, ब्रेक लागत नसल्याने बस वेगाने फलाट क्रमांक पाचच्या दिशेने गेली आणि थेट कट्ट्यावर चढली. अपघाताच्या वेळी शाळा व महाविद्यालये सुटण्याची वेळ असल्याने बस स्थानकावर प्रवासी व विद्यार्थ्यांची मोठी गर्दी होती. अचानक समोर आलेल्या बसमुळे स्थानकात एकच पळापळ उडाली. या अपघातात बोकटे येथील रहिवासी रामनाथ खंडू तुरकणे यांना बसचा जोरदार धक्का लागून ते जखमी झाले असून त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. गर्दी असतानाही बस कोणाच्या अंगावर न गेल्याने मोठा अनर्थ टळल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास टाकला.

हे देखील वाचा : जानेवारीत ग्राहकांची UPI वरून रेकॉर्ड ब्रेक सोने खरेदी; नोंदवला गेला नवा विक्रम

बसचे वेळेवर मेंटेनन्स केले जात नसल्याचा आरोप (Brakes Fail)

दरम्यान, बसचे ब्रेक फेल झाल्याची बाब गंभीर असून हीच बस जर रस्त्यावर असती तर मोठी दुर्घटना घडली असती, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. बसचे वेळेवर मेंटेनन्स केले जात नसल्याचा आरोपही यानिमित्ताने पुढे आला आहे. या घटनेची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून चौकशी होणार का, असा सवाल संतप्त प्रवासी व नागरिकांमधून उपस्थित केला जात आहे.