Bribery : नगर : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (Anti-Corruption Department) २०२४ मध्ये नाशिक विभागात (Nashik Division) तब्बल २१९ लाचखोरांवर (Bribery) कारवाई केली आहे. यात नाशिक जिल्ह्यात वर्षभरता ५२ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यापाठोपाठ अहिल्यानगर जिल्ह्यात ३० तर धुळे जिल्ह्यात २० गुन्हे (Crime) दाखल करण्यात आले आहे. तर नंदुरबार जिल्ह्यतात १२ तर जळगाव जिल्ह्यात ३७ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ही आकडेवारी पाहता लाचखोरीत नाशिक विभागात अहिल्यानगर (Ahilyanagar) जिल्हा दुसऱ्या नंबरवर आहे.
नक्की वाचा : देवेंद्र फडणवीस यांनी किती जणांचे रक्ताचे डाग धुवून त्यांना सरकारमध्ये घेतलं?;संजय राऊतांचा सवाल
नाशिक परिक्षेत्रात या कारवाईत २१९ लाचखोर
आरोपीमध्ये वर्ग १ चे १७ अधिकारी, वर्ग २ चे २० तर वर्ग ३ चे ११२ जणांचा समावेश आहे. तर वर्ग ४ चे १४, इतर लोकसेवक २० व खासगी ३६ व्यक्तीचा समावेश आहे.
अवश्य वाचा : गणेश मूर्तिकार वरील कारवाई थांबावी; संघटनेचे सभापती राम शिंदे यांना निवेदन
लाच घेण्यामध्ये पोलीस व महसूल विभाग आघाडीवर (Bribery)
लाच घेण्यामध्ये पोलीस व महसूल विभाग आघाडीवर असल्याचे यावर्षीही दिसून आले. पोलीस विभागात १० सापळ्यात केलेल्या कारवाईमध्ये १० पोलीस व त्यांच्यासाठी लाच घेणारे चार खासगी व्यक्ती अडकल्या. तसेच महसूल विभागातील सात कारवाईत सात कर्मचारी (वर्ग 3) व त्यांच्यासाठी तीन खासगी व्यक्तीने लाच घेतली आहे. अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे वर्षभरात ११ विभागातील लाचखोरीच्या तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामध्ये नगर विकास, वैध मापन शास्त्र, जिल्हा परीषद, पोलीस, विद्युत, पाटबंधारे, महसूल, उत्पादन शुल्क, शिक्षण, वसंतराव नाईक महामंडळ, भूमी अभिलेख या विभागांचा समावेश आहे. त्यात पोलीस विभागात सर्वाधिक पोलीस अंमलदार लाचेच्या जाळ्यात अडकले आहेत. तसेच महसूल विभागातील वर्ग तीनचे सात कर्मचारी लाच घेताना सापडले. त्यांच्यासाठी तीन खासगी व्यक्तीही लाच घेताना अडकल्या आहेत. त्याखालोखाल विद्युत 3, जिल्हा परिषद 2, नगरविकास, वैध मापन शास्त्र, पाटबंधारे, उत्पादन शुल्क, शिक्षण, वसंतराव नाईक महामंडळ, भूमी अभिलेख या विभागात प्रत्येकी एक कारवाई करण्यात आली आहे.