Bribery : २० हजारांची लाच घेताना सहायक आयुक्त जेरबंद 

Bribery : २० हजारांची लाच घेताना सहायक आयुक्त जेरबंद 

0
Bribery : २० हजारांची लाच घेताना सहायक आयुक्त जेरबंद 
Bribery : २० हजारांची लाच घेताना सहायक आयुक्त जेरबंद 

Bribery : नगर : मत्स्यसंवर्धन प्रकल्पाच्या उर्वरित अनुदानासाठी प्रस्ताव शासनास पाठविण्याकरिता २० हजारांची लाच (Bribery) घेताना मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्त लाचलुचपत विभागाच्या पथकाने ताब्यात घेतला आहे. रमेश कुमार जगन्नाथ धडील असे ताब्यात घेतलेल्या लाचखोर आयुक्तांचे नाव आहे. लाच लुचपत विभागाच्या (Anti corruption bureau) पथकाने राहुरी येथून धडली यास ताब्यात घेतले आहे.

नक्की वाचा : चालकाच्या रागामुळे चार निष्पापांचा गेला बळी

४० हजार रुपयांची लाचेची मागणी

याबाबत राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार यांची पत्नी व बहीण यांच्या नावे प्रधानमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत भुजलाशयीन पिंजरा मत्स्यसंवर्धन हा प्रकल्प मंजूर झाला आहे. शासनाच्या अटी व शर्ती प्रमाणे प्रकल्पाचे कामकाज पूर्ण झाले आहे. तक्रारदार यांची पत्नी यांच्या नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून आज पर्यंत ३ लाख ८८ हजार ८०० रुपये अनुदान प्राप्त झाले आहे. तसेच तक्रारदार यांची बहीण यांचे नावे असलेल्या प्रकल्पास शासनाकडून २९ लाख १६ हजार रुपयांचे अनुदान शासनाकडून येणे बाकी आहे. दोन्ही प्रकल्पांचे उर्वरित अनुदान मिळण्याकरिता प्रस्ताव शासनास पाठविण्याकरिता सहाय्यक आयुक्त रमेशकुमार धडील यांनी ४० हजार रुपयांची लाचेची मागणी केली.

अवश्य वाचा : यंदाच्या वर्षी फक्त पहिलीच्या वर्गालाच सीबीएससी : दादा भुसे

२० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले (Bribery)

तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे गुरुवार (ता. २०) तक्रार दाखल केली. त्यानुसार लाचलुचपत विभागाने सापळा रचून पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी केली. राहुरी तालुक्यातील वरंवडी येथील एका खासगी कार्यक्रमाच्या ठिकाणी सापळा रचून रमेश कुमार धडील यांनी पंचा समक्ष तक्रारदार यांच्याकडून लाचेचा पहिला हप्ता म्हणून २० हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. ही कारवाई पोलीस निरीक्षक राजू आल्हाट, पोलीस अंमलदार उमेश मोरे, गजानन गायकवाड, सचिन सुद्रुक, हारुण शेख, अंमलदार संतोष शिंदे, रवींद्र निमसे, बाबासाहेब कराड, चंद्रकांत काळे, विजय गंगुल, दशरथ लाड यांच्या पथकाने केली.