Bribery : नगर : सौर कृषी पंप बसविण्याच्या ठिकाणचा सर्वे करण्यासाठी ७०० रुपयांची लाच (Bribery) घेताना वरिष्ठ तंत्रज्ञ (वायरमन) लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (Anti-Corruption Department) पथकाने ताब्यात घेतला आहे. ही कारवाई मंगळवारी (ता. २८) जामखेड तालुक्यातील अरणगाव येथे करण्यात आली. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात (Jamkhed Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘त्या’ दोन्ही डॉक्टरांचा जामीन अर्ज मागे
१ हजारांची लाचेची मागणी
सुनील रघुनाथ नांगरे (वय-५४, रा. करंजगाव, ता. कोपरगाव), असे लाच घेतलेल्या महावितरणच्या अधिकाऱ्याचे नाव आहे. तक्रारदार यांनी महावितरण कंपनीतर्फे राबविण्यात येणाऱ्या सौर पंपासाठी ऑनलाइन अर्ज केला होता. त्या प्रमाणे त्यांना महावितरण कंपनीतर्फे सौर पंप बसविण्याकरिता ३२ हजार ७५ रुपये शासकीय फी ऑनलाईन द्वारे भरली. त्यानंतर वायरमन नागरे यांनी शेतीच्या ठिकाणी पाहणी करून ऑनलाईन अप्लिकेशन वर भरली. त्यानंतर तक्रारदार यांनी नागरे यांना सौर पंप याबाबत विचारणा केली. त्यावेळी नागरे यांनी सौर पंप बाबत सर्वे पूर्ण करण्याकरिता १ हजारांची लाचेची मागणी केली.
नक्की वाचा : सुनीता भांगरे यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश
पंचासमक्ष लाच घेताना पकडले (Bribery)
तक्रारदाराने याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, अहिल्यानगर येथे तक्रार दाखल केली. तक्रारीची खात्री करण्यासाठी पडताळणी करण्यात आली असता १ हजारांची मागणी केली. पुढे तडजोड करून ७०० रुपायांची लाच घेतली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पंचासमक्ष नागरेला लाच घेताना पकडले. ही कारवाई पोलीस उपअधीक्षक अजित त्रिपुटे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजू आल्हाट यांच्या पथकाने केली. याबाबत जामखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



