Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या POCSO प्रकरणातील खटल्यात न्यायालयाचा ‘हा’ निर्णय

Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या POCSO प्रकरणातील खटल्यात न्यायालयाचा ‘हा’ निर्णय

0

Brijbhushan Sharan Singh : अहिल्यानगर : भाजपाचे (BJP) माजी खासदार तथा भारतीय कुस्ती महासंघाचे माजी प्रमुख ब्रिजभूषण शरण सिंह (Brijbhushan Sharan Singh) यांना दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने दिलासा दिला आहे. पॉक्सो (POCSO) कायद्यांतर्गत दाखल असलेला खटला पटियाला हाऊस न्यायालयाने सोमवारी बंद केला आहे. हा खटला एका अल्पवयीन कुस्तीगीरने (Wrestler) दाखल केला होता.

नक्की वाचा : ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी कोणालाच विश्वासात घेत नाहीत’-संजय राऊत

महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप

कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचा लैंगिक छळ केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर बृजभूषण यांना भारतीय कुस्ती महासंघाचे चे अध्यक्षपदही सोडावे लागले होते. तसेच त्यांच्यावर न्यायलयात केसही उभी राहिली होती. मात्र, आता त्यांना दिलासा मिळाला आहे.

अवश्य वाचा : मुंबईनंतर पुणे व सोलापूर मध्ये मान्सूनची एन्ट्री!

न्यायालयाने पोलिसांचा क्लोजर रिपोर्ट स्वीकारला (Brijbhushan Sharan Singh)

या प्रकरणात पोलिसांनी क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. यानंतर सोमवारी पटियाला हाऊस न्यायालयाने पोलिसांनी सादर केलेला क्लोजर रिपोर्ट स्वीकारला. त्यामुळे आचा अर्थ असा की आता या प्रकरणात माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्यावर कोणतीही कारवाई होणार नाही.

Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या POCSO प्रकरणातील खटल्यात न्यायालयाचा ‘हा’ निर्णय
Brijbhushan Sharan Singh : ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या POCSO प्रकरणातील खटल्यात न्यायालयाचा ‘हा’ निर्णय

दरम्यान, १५ जून २०२३ रोजी दिल्ली पोलिसांनी न्यायालयात ५५० पानांचा अहवाल सादर केला होता. या अहवालात पोलिसांनी म्हटलं होतं की, या प्रकरणाच्या तपासा दरम्यान माजी खासदार ब्रिजभूषण शरण सिंह यांच्या विरोधात कोणतेही ठोस पुरावे आढळून आलेले नाहीत. तसेच पोलिसांनी असंही नमूद केलं होतं की अल्पवयीन कुस्तीगीर आणि तिच्या वडिलांनी त्यांचे पूर्वीचे आरोप दंडाधिकाऱ्यांसमोर मागे घेतले आहेत.