Brutal Beating : पाथर्डी : तालुक्यातील मोहरी रोड (Mohari Road) परिसरात एका ५५ वर्षीय व्यक्तीवर अमानुष मारहाण (Brutal Beating) केल्याची धक्कादायक घटना बुधवारी (ता. १) सकाळी उघडकीस आली. मोहन पिराजी सगळे ( रा. हंडाळवाडी ,वय ५५) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांना हात-पाय बांधून (Hands and Feet Tied), गळ्याला दोरी लावून तसेच तोंडात काचा कोंबून रस्त्याच्या कडेला झाडाझुडपात टाकून दिल्याचे आढळून आले.
नक्की वाचा : शिर्डी जमीन व्यवहारात फसवणूक; खरात पती-पत्नीसह पाच जणांवर गुन्हा दाखल
गंभीर अवस्थेत असल्याचे निदर्शनास
ही घटना गाडगे आमराई येथून मोहरी रोडकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना झाडाझुडपात संशयास्पद अवस्थेत एक व्यक्ती पडलेली दिसल्याने त्यांनी तत्काळ जवळ जाऊन पाहणी केली असता, सदर व्यक्तीचे हात-पाय बांधलेले असून तो गंभीर अवस्थेत असल्याचे निदर्शनास आले. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक व नातेवाईकांनी तत्काळ धाव घेत मोहन सगळे यांची सुटका केली आणि त्यांना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
🪀 अहिल्यानगर जिल्ह्यातील अपडेट्स मिळविण्यासाठी क्लिक करा
📲 https://chat.whatsapp.com/GuIoV5EQN6PEvBPT69TR0a
मारहाणीचे कारण अद्याप अस्पष्ट (Brutal Beating)
सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. दरम्यान, हा प्रकार नेमका कोणत्या कारणामुळे घडला, यामागील हेतू काय होता, तसेच संबंधित व्यक्तीला कोणी मारहाण केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. जखमी व्यक्ती पूर्णपणे शुद्धीवर आल्यानंतर त्यांच्या जबाबावरून या प्रकरणाचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे.



