Buddhism Gujarat govt :बौद्ध धर्म हिंदू धर्माचा भाग नाही;गुजरात सरकारचे परिपत्रक जारी

गुजरात सरकारने बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी नवीन परिपत्रक जारी करत नवीन नियम लागू केलाय. या परिपत्रकावर उपसचिव विजय बधेका यांनी स्वाक्षरी आहे.

0
Buddhism Gujarat govt
Buddhism Gujarat govt

नगर : बौद्ध धर्म (Buddhism) हा वेगळा धर्म असून त्याचा हिंदू धर्माशी संबंध नसल्याचं गुजरात सरकारने (Gujrat Governemnt) काढलेल्या एका परिपत्रकात म्हटलं आहे. गुजरात सरकारने बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी नवीन परिपत्रक (Circular) जारी करत नवीन नियम लागू केलाय. गुजरात सरकारच्या या नव्या नियमानुसार, ज्या कोणी व्यक्तीला बौद्ध धर्मात धर्मांतर करायचे असेल तर त्याला कायदेशीर प्रक्रिया पार पाडावी लागेल. तसेच धर्मांतर करणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना एका महिन्याआधी द्यावी लागणार असल्याचे देखील सांगण्यात आले आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा मोठा निर्णय;‘पीएसआय’ पदाची शारीरिक चाचणी लांबणीवर  

गृह विभागाकडून ८ एप्रिल रोजी परिपत्रक जाहीर (Buddhism Gujarat govt)

गुजरातमध्ये धर्मांतरासाठी धर्म स्वातंत्र्य कायदा, २००३ ची तरतुद आहे. यानुसार, हिंदू धर्मातून बौद्ध, जैन आणि शीख तसेच इतर धर्मात धर्मांतर करण्यासाठी संबंधित जिल्हा दंडाधिकाऱ्यांची पूर्व परवानगी आवश्यक आहे. दरम्यान बौद्ध धर्म स्वीकारणाऱ्यांच्या अर्जांवर नियमानुसार कार्यवाही होत नसल्याचं सरकारच्या निदर्शनास आल्यानंतर गुजरातच्या गृह विभागाने ८ एप्रिल रोजी हे परिपत्रक जाहीर केले होते.या परिपत्रकावर उपसचिव विजय बधेका यांनी स्वाक्षरी आहे. गुजरातमध्ये दरवर्षी दसरा आणि इतर सणांना आयोजित कार्यक्रमांमध्ये बहुतांश दलित मोठ्या प्रमाणावर बौद्ध धर्म स्वीकारत असल्याचं दिसून आले आहे.

अवश्य वाचा : सलमान खानचे चाहत्यांना मोठे गिफ्ट;ईदनिमित्त केली नव्या चित्रपटाची घोषणा  

गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्यानुसार ‘बौद्ध धर्म हा वेगळा धर्म’ (Buddhism Gujarat govt)

दरम्यान जाहीर करण्यात आलेल्या परिपत्रकानुसार, जिल्हा दंडाधिकारी कार्यालये मनमानीपणे गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याचा अर्थ लावत आहे. हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात परिवर्तन करण्याची परवानगी मागणाऱ्या अर्जांमध्ये नियमानुसार प्रक्रिया पाळली जात नसल्याचे गृहविभागाच्या निदर्शनास आले आहे. बऱ्याच वेळा हिंदू धर्मातून बौद्ध धर्मात धर्मांतर करण्यासाठी, पूर्व परवानगी आवश्यक नसल्याचं अर्जदार आणि स्वायत्त संस्थांकडून सांगितलं जाते. “गुजरात धर्म स्वातंत्र्य कायद्याच्या संदर्भात, बौद्ध धर्म हा वेगळा धर्म मानला जाईल, असं परिपत्रकात म्हटलंय.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here