Budget : नगर : केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन (Nirmala Sitharaman) यांनी सादर केलेला हा सर्वसमावेशक अर्थसंकल्प (Budget) विकसित भारताच्या दिशेने आणारा मार्ग अधिक प्रशस्त करणारा आहे. सर्वसामान्य मध्यमवर्गीयांची बचत वाढणार आहे. त्यांची क्रयशक्ती उंचावल्याने देशाच्या विकासाला चालना मिळेल. १४० कोटी भारतीयांच्या आशा-आकांक्षा पूर्ण करणारा हा अर्थसंकल्प असून विकसित भारताचे ध्येय सामान्य नागरिकच पुढे नेतील, असा विश्वास जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांनी व्यक्त केला. नागरिकांची बचत वाढून तेच देश विकासाचे भागीदार कसे बनतील, यासाठी विशेष तरतुदी करण्यात आल्या असल्याचेही त्यांनी नमूद केले.
नक्की वाचा : पंतप्रधान मोदींनाही पडली ‘छावा’ची भुरळ
अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी विखे यांचा माध्यमांशी संवाद
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन् यांनी सादर केलेल्या अर्थसंकल्पाची माहिती देण्यासाठी मंत्री विखे पाटील यांनी माध्यमांशी संवाद साधला शहर जिल्ह्याचे अध्यक्ष अभय आगरकर, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख बाबूशेठ टायरवाले, विनायक देशमुख, जिल्हा बँकेचे संचालक अंबादास पिसाळ, सचिन पारखी आदी याप्रसंगी उपस्थित होते.
अवश्य वाचा : शिर्डीत पोलिसांकडून ७२ भिक्षेकरी ताब्यात; १२ महिला, ६० पुरुष
विखे पाटील म्हणाले की, (Budget)
शेतकरी, गरीब, महिला आणि युवा हे विकसित भारताचे चार प्रमुख स्तंभ आहेत. या चारही गटांच्या सशक्तिकरणासाठी अर्थसंकल्पाने महत्वपूर्ण पावले उचलली आहेत. सामाजिक क्षेत्र, लहान मुले व शिक्षण, पोषण तसेच आरोग्यापासून स्टार्टअप्स आणि गुंतवणुकीपर्यंत प्रत्येक क्षेत्राला गती देणात्या तरतुदी करण्यात आल्या आहेत. हा अर्थसंकल्प गरीब आणि मध्यमवर्गीयांना सशक्त करणार असून तरुणांना रोजगाराच्या असंख्य संधी निर्माण करणारा आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
विखे पाटील म्हणाले की, पंतप्रधान धन-धान्य कृषी योजना, खाद्यतेल आत्मनिर्भरतेसाठी सहा वर्षांची विशेष मोहीम, मखाना आणि मत्स्य उत्पादनासाठी स्वतंत्र मंडळ, फळ-भाजीपाला उत्पादक व कापूस शेतकन्यांसाठी विशेष योजना, गुरिया आत्मनिर्भरता योजना यांसारख्या महत्वपूर्ण योजनांमुळे देशातील अन्नदाते अधिक सक्षम होतील.
याशिवाय, ‘भारतीय भाषा पुस्तक योजना’, पान नॅशनल सेंटर ऑफ एक्सलन्स’ ची स्थापना, सर्व सरकारी माध्यमिक शाळांना ब्रॉडबॅण्ड कनेक्टिव्हिटी, पुढील पाच वर्षांत ५० हजार अटल टिंकरिंग लॅब्स यांसारख्या महत्वपूर्ण शैक्षणिक तरतुदींमुळे भारतातील विद्यार्थी जागतिक दर्जाच्या शिक्षणाने सक्षम होतील, असेही त्यांनी सांगितले.
देशाच्या उज्वल भविष्यासाठी मध्यमवर्गाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर विशेष भर देण्यात आला आहे. १२ लाखांपर्यंतचं उत्पन्न करमुक्त, ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक व्याजावर टीडीएस मर्यादा ५० हजार रुपयांवरून ९१ लाख, घरभाड्यावर टीडीएस मर्यादा १२.४० लाख वरून १६ लाख यांसारख्या महत्वाच्या निर्णयांमुळे मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळेल.
सामाजिक विकासासोबतच पायाभूत सुविधा, गृहनिर्माण, शाश्वत आर्थिक विकास, तंत्रज्ञान, आरोग्य, कृषी, एमएसएमई आणि निर्यात यांसारख्या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणात तरतुदी करण्यात आल्या आहेत. उत्पादन क्षेत्रावर अधिक लक्ष केंद्रित करून लघु व मध्यम उद्योगांना बळकटी देण्यासाठी सरकारने महत्वाची पावले उचलली आहेत, असेही यांनी सांगितले.