नगर: देशाचा सर्वसाधारण अर्थसंकल्प (Budget 2026) अर्थमंत्रालय नेहमीप्रमाणे,यावर्षीही १ फेब्रुवारीला (February 1) संसदेत सादर करणार आहे. मात्र तुम्ही कधी विचार केला आहे का की अर्थसंकल्प सादर करण्यासाठी १ फेब्रुवारीची निवड का (Why was February 1st chosen?) केली जाते,हा प्रश्न सामान्य लोकांना देखील अनेकदा पडतो? जाणून घेऊयात याबाबतची सविस्तर माहिती…
नक्की वाचा: अर्थसंकल्प मांडण्यापूर्वी हलवा समारंभ का आयोजित केला जातो?
अर्थसंकल्पाची तारीख कशी बदलली ? (Budget 2026)
भारतीय इतिहासात,अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख नेहमीच १ फेब्रुवारी नव्हती. २०१७ पर्यंत, केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारीच्या शेवटच्या दिवशी सादर केला जात असे. ही परंपरा ब्रिटिश राजवटीपासूनची होती. स्वातंत्र्यानंतर अनेक दशके ती तशीच चालू राहिली. २०१७ मध्ये, मात्र मोदी सरकारने ही जुनी परंपरा मोडण्याचा निर्णय घेतला आहे. तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांनी या बदलाचा पाया रचला, फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर करण्याची तारीख १ फेब्रुवारी केली. यामागील सरकारचा तर्क अतिशय व्यावहारिक होता.
अवश्य वाचा: महाराष्ट्राचा चित्ररथ ठरला अव्वल!गणेशोत्सवाची संकल्पना देशभरात सर्वोत्कृष्ट
१ फेब्रुवारीला अर्थसंकल्प का ?(Budget 2026)
भारतात, नवीन आर्थिक वर्ष १ एप्रिलपासून सुरू होते. फेब्रुवारीच्या अखेरीस अर्थसंकल्प सादर केला जात असताना, संसदेत त्यावर चर्चा आणि तो मंजूर करण्याची प्रक्रिया बराच वेळ घेत असे. कधी कधी, ते मे किंवा जूनपर्यंत वाढत असे. ज्यामुळे नवीन योजनांसाठी निधी जाहीर होण्यास विलंब होत असे. १ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केल्याने सरकारला १ एप्रिलपासून सर्व नवीन तरतुदी आणि निधी वाटप सुरळीतपणे अंमलात आणण्यासाठी दोन महिन्यांचा अतिरिक्त वेळ मिळतो.



