Budget | मुंबई : अर्थसंकल्पात प्रत्येक क्षेत्र, प्रत्येक घटक आणि प्रत्येक नागरिकाला सक्षम करण्याचं स्पष्ट ध्येय तर आहेच, सोबतच त्यांना प्रोत्साहन देणारे धोरणही मांडण्यात आलं आहे. तसेच विकसित भारताकडे दमदार पाऊल टाकणारा तसेच युवा पिढीसाठी हा अर्थसंकल्प (Budget) फायदेशीर असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या माजी महिला सरचिटणीस व पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी परिषद मुंबई महिला अध्यक्षा अनुजा साळवी यांनी दिली.
हेही वाचा – अहिल्यानगरचा सर्पमित्र आकाश जाधव गांजा तस्करीत जेरबंद; पुन्हा एक रिलस्टार गुन्हेगार?
विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक मजबूत आणि दूरदर्शी पाऊल (Budget)
अनुजा साळवी म्हणाल्या, विकसित भारताचा संकल्प घेऊन कार्य करणारे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली आज अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेले केंद्रीय बजेट म्हणजे विकसित भारताच्या दिशेने टाकलेले एक मजबूत आणि दूरदर्शी पाऊल आहे. देशाच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा हा अर्थसंकल्प सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला, युवा आणि उद्योग,आरोग्य क्षेत्रासाठी मोठी संधी घेऊन आला आहे.
अवश्य वाचा – केंद्रीय अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? निर्मला सीतारमण यांनी काय सांगितलं?
ग्रोथ हबसाठी पाच हजार कोटी (Budget)
अनुजा साळवी पुढे म्हणाल्या की,लखपती दिदी योजनेच्या यशानंतर महिलांसाठी स्वतंत्र मॉल्स आणि उद्योगांच्या संधी तयार करण्याची योजना अत्यंत महत्त्वाची आहे. प्रत्येक जिल्ह्यात उच्च शिक्षण घेणार्या मुलींसाठी वसतीगृहांची योजना तयार करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात आपात चिकित्सा व्यवस्था उभी करण्याचा निर्णय आरोग्य क्षेत्रात मोलाचा ठरेल. त्याचबरोबर मुंबई-पुणे, पुणे-हैदराबाद हायस्पीड कॉरिडॉरमुळे जीडीपीत मोठी वाढ होईल. प्रत्येक ग्रोथ हबसाठी पाच हजार कोटी प्रत्येकी पाच वर्षांत प्राप्त होणार आहेत.
शहरीकरणाला नियोजनबद्ध करुन, उद्योग आणि उद्योजकतेला प्रोत्साहन देऊन, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीसाठी खंबीर उपाययोजना या अर्थसंकल्पातून करण्यात आल्या आहेत. पायाभूत सुविधा क्षेत्रात १२ लाख कोटीची गुंतवणूक, शेती, पशुपालन, मत्स्यव्यवसाय आणि सिंचन यासाठी भरीव तरतुदी करण्यात आली असून पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारने सादर केलेले हे बजेट खऱ्या अर्थाने ‘सबका साथ, सबका विकास’ या संकल्पनेला बळ देणारे आहे. २०२६-२७ च्या अर्थसंकल्पाद्वारे स्वावलंबी आणि विकसित भारत हा केवळ एक नारा नाही तर आपल्या सरकारचा संकल्प असल्याचे गौवोद्गार अनुजा साळवी काढले.



