Buldhana Hair Loss : नगर : बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील सहा गावातील गावकऱ्यांच्या केसाची जलद गतीने गळती होऊन टक्कल पडत (Buldhana Hair Loss) आहे. यामुळे गावकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. बुलढाणा आरोग्य विभागाने (Health Department) या गावाची पाहणी केली असता. तेथील पाण्यात नायट्रेटचे प्रमाण (Nitrate Level) जास्त आढळून आले आहे, अशी माहिती बुलढाणा (Buldhana) जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते यांनी दिली.
नक्की वाचा : रस्ते अपघातातील जखमींना मिळणार कॅशलेस उपचार,नितीन गडकरींची घोषणा
गावातील स्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न
या सहा गावातील स्थितीमुळे आरोग्य यंत्रणेसमोर मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. केसगळतीचे नेमके कारण काय हे शोधण्यासाठी गावातील पाण्याचे नमुने संकलित करुन अहवालासाठी पाठवण्यात आले होते. आज या पाण्याचा अहवाल प्राप्त झाला. या अहवालातून कारण समोर आले आहे.
अवश्य वाचा : अहिल्यानगरमध्ये तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचे आयोजन
पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे समोर (Buldhana Hair Loss)
येथील पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण जास्त असल्याचे समोर आले आहे. या संदर्भात जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल गीते यांनी माहिती दिली. ते म्हणाले की, बाधित गाव परिसरातील पट्टा हा खारपणपट्ट्यात येतो. तेथे पाण्यातील नायट्रेटचे प्रमाण जास्त आहे. साधारणत: पाण्यामध्ये नायट्रेटचे प्रमाण १० टक्के असायला पाहिजे मात्र, या गावांमध्ये ते ५४ टक्के आहे. त्यामुळे या भागातील पाणीच घातक असल्याचे त्यांनी सांगितले. याशिवाय आरसेनिक व लीड तपासणीसाठी पुणे प्रयोगशाळेत पाणी नमुने पाठवल्याची माहिती ही त्यांनी यावेळी दिली. सध्या अशा रुग्णांची संख्या घटत असून ज्यांचे केस गेले होते, त्यांचे केस परत येत आहेत, असेही डॉ. गिते यांनी सांगितले.