Bull | समशेरपूर येथील मधुकर ढोन्नर यांचा वळू ठरला ‘चॅम्पियन’

0
Bull
Bull

Bull | अकोले : अकोले (Akole) तालुक्यातील बारी, जहागीरदार वाडी, कळसूबाई यात्रा महोत्सवानिमित्त शिखराच्या पायथ्याशी डांगी, देशी-विदेशी जनावरांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये समशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांचा वळू (Bull) दोनदा चॅम्पियन ठरला.

हेही वाचा – संरक्षित जागेत मांडली ‘पे अँड पार्क’ची दुकानदारी; महापालिकेचा अजब कारभार चव्हाट्यावर

प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष (Bull)

या प्रदर्शनाचे हे चौथे वर्ष आहे. जहागिरदारवाडी येथे दरवर्षी एप्रिल महिन्यात ग्रामपंचायत, पंचायत समिती, आदिवासी विकास विभाग आणि कृषी विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने डांगी आणि देशी-विदेशी जनावरांचे व कृषीचे प्रदर्शन भरविले जाते. यंदाच्या प्रदर्शनासाठी अकोले तालुक्याबरोबर इगतपुरी, संगमनेर, जुन्नर, सिन्नर आदी तालुक्यांतून हजारो जनावरे खरेदी-विक्री तर काही जनावरे प्रदर्शनासाठी शेतकर्‍यांनी आणली होती. सलग तीन दिवस चालणार्‍या यात्रा महोत्सवात व प्रदर्शनात हजारो नागरिकांनी आपली उपस्थिती लावली. जनावरांसाठी यावर्षी वेगवेगळ्या तालुक्यातील ४० शेतकर्‍यांनी आपली जनावरे रिंगणात उतरवली होती. या प्रदर्शनचे उद्घाटन आमदार डॉ. किरण लहामटे यांच्या हस्ते झाले.

अवश्य वाचा – वन विभागाच्या हलगर्जीपणामुळे बिबट्याचे पलायन; वांगदरी ग्रामस्थांचा आरोप

तो वळू (दोनदा) चॅम्पियन (Bull)

यावेळी सरपंच पंढरीनाथ खाडे, यात्रा समिती अध्यक्ष हिरामण खाडे, पोलीस पाटील नामदेव खाडे, युवक अध्यक्ष अक्षय आभाळे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अशोक धिंदाळे यांचेसह सर्व सदस्य उपस्थित होते. या प्रदर्शनात समशेरपूर येथील मधुकर कारभारी ढोन्नर यांचा वळू (दोनदा) चॅम्पियन ठरला. तर वळूमध्ये प्रथम क्रमांक आदतमध्ये जालिंदर निवृत्ती गंगावणे (ढोकरी), दोन दात मधुकर कारभारी ढोन्नर,  सहा दातमध्ये डांगी गोपालक संघटन वाढवली (त्र्यंबकेश्‍वर), चार दातमध्ये किसन भाऊ गंभीरे (गंभीरवाडी), दुभती गायमध्ये ज्ञानदेव विठोबा कासार (शेरणखेल), कालवडमध्ये दत्तू तुकाराम कोकणे (शेरणखेल), गाभण गाय दत्तू दामू वाजे (खेडभैरव) यांची प्रथम क्रमांकाने निवड झाली आहे. सर्व प्रथम विजेत्यांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. याप्रसंगी माजी उपसभापती भरत घाणे, ग्रामसेवक माधव धोंगडे, बारी सरपंच वैशाली खाडे, तुकाराम खाडे, वासळी सरपंच काशिनाथ कोरडे, राजू काळे, बाळू शिंदे आदी उपस्थित होते. या प्रदर्शनात काही अनूचित प्रकार घडू नये म्हणून राजूरचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here