नगर : संसदेचे हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु झाल्यापासून चर्चेचा विषय ठरत आहे. या अधिवेशनात आज पुन्हा गोंधळ झाल्याचे पाहायला मिळाले.भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी संसदेत ‘काँग्रेस का हाथ सोरस के साथ’ अशा घोषणा दिल्याचा विरोधी पक्षांच्या खासदारांनी तीव्र निषेध नोंदवला. यानंतर लोकसभेचे सत्र दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले. मात्र यापूर्वी राज्यसभेत काँग्रेस खासदाराच्या जागेवर नोटांचे बंडल (Bundle of banknotes) सापडल्याची माहिती राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी दिली. या प्रकरणावरून देखील सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांशी भिडल्याचे पाहायला मिळाले.
नक्की वाचा : राज्यात शपथविधी पार पडताच शासकीय बंगल्याचीही अदलाबदल
जगदीप धनखड यांचा सभागृहात चलनी नोटा सापडल्याचा आरोप (Congress MP Seat)
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड यांनी काल (ता.५) नियमित तपासणी दरम्यान सभागृहात चलनी नोटा सापडल्याचा आरोप केला.सुरक्षा अधिकार्यांना राज्यसभा सभागृहातील आसन क्रमांक २२२ वर नोटांचे बंडल सापडले असल्याचे धनखड यांनी सांगितले. चलनी नोटा सापडलेली ही जागा सध्या काँग्रेसचे खासदार अभिषेक मनू सिंघवी यांना नेमून देण्यात आलेली आहे. दरम्यान या प्रकरणाची सध्या चौकशी सुरू असल्याचेही धनखड यांनी सांगितले.
अवश्य वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पहिली सही;पुण्यातील रुग्णाला मिळाली मदत
राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड म्हणाले की,“मी सदस्यांना सूचित करत आहे की,काल सभागृहाचे कामकाज संपल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी सुरू होती. सध्या अभिषेक मनू सिंघवी यांना देण्यात आलेल्या जागेवर चलनी नोटांचा गठ्ठा सुरक्षा अधिकार्यांनी जप्त केला आहे. ही बाब लक्षात आणून देण्यात आल्यानंतर मी चौकशीचे आदेश दिले आहेत आणि सध्या या प्रकरणाचा तपास सुरू आहे”.
काय म्हणाले अभिषेक मनू सिंघवी… (Congress MP Seat)
या संपूर्ण घटनेवर अभिषेक मनु सिंघवी यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. “मी राज्यसभेत जाताना फक्त ५०० ची एक नोट बरोबर ठेवतो. मी या प्रकरणाबद्दल पहिल्यांदाच ऐकतोय. काल मी बरोबर १२ वाजून ५७ मिनिटांनी सभागृहात आलो. सभागृहाचे कामकाज १ वाजता तहकूब झाले. त्यानंतर मी कॅन्टीनमध्ये १ वाजून ३० मिनिटांपर्यंत अयोध्या प्रसाद यांच्याबरोबर बसून होतो आणि नंतर निघून गेलो”.