Marathi Movie: विद्यार्थ्यांच्या शाळेतील प्रवास उलगडणार ‘बंटी बंडलबाज’ चित्रपटातून 

'बंटी बंडलबाज' या चित्रपटात आजच्या युगातील इंटरनेट, लॅपटॉपच्या साहाय्याने परीक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शाळेत प्रथम येण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न तसेच त्यांनी शाळेत केलेली धमालमस्ती दिसणार आहे.

0
Marathi Movie
Marathi Movie

नगर : मराठी चित्रपटसृष्टीत अनेक नवनवीन प्रयोग होताना दिसत आहेत. आता विद्यार्थ्यांच्या जीवनावर (Students Life) आधारित एक चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘बंटी बंडलबाज’ असं या चित्रपटाचे नाव आहे. यू. ए. कथाचित्र, बायसोसिएशन फिल्म्स आणि विचित्रकथा यांच्याकडून ‘बंटी बंडलबाज’ (Bunty Bundalbaz) या चित्रपटाची घोषणा करण्यात आली आहे. या चित्रपटाचे शूटिंग सध्या सुरु करण्यात आले आहे.

नक्की वाचा : राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास होणार महाग; आजपासून टोल दरात वाढ   

‘बंटी बंडलबाज’ मध्ये दिसणार दोन शाळकरी मुलांची कथा (Marathi Movie)

‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटात आजच्या युगातील इंटरनेट, लॅपटॉपच्या साहाय्याने परीक्षेच्या कचाट्यातून सुटण्यासाठी आणि शाळेत प्रथम येण्यासाठी दोन विद्यार्थ्यांचा प्रयत्न तसेच त्यांनी शाळेत केलेली धमालमस्ती असे कथानक आहे. या सिनेमात राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार प्राप्त गिरीश कुलकर्णी आणि देविका दफ्तरदार प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. सोबतीला ओम बेंडखळे, सार्थक पाटील, गणेश रेवडेकर, आकांक्षा गाडे यांसारखे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसतील. ‘बंटी बंडलबाज’ या चित्रपटाची निर्मिती वैदही कृष्णन, ईशान महापात्रा, नेहा कोळवणकर आणि विवेक कदम यांनी केली आहे. अनिकेत रुमडे यांनी दिग्दर्शनासहित कथा, संवाद, पटकथा लेखनाची धुरा सांभाळली आहे तसेच या चित्रपटाचे सिनेमेटोग्राफर प्रताप राऊत आहेत.

अवश्य वाचा : नगर, शिर्डी लाेकसभा काेण जिंकणार? एक्झिट पोलने काय वर्तविले भाकीत?

शाळकरी मुलांची हुशारकी, मस्ती, धमाल, निरागसता दिसणार (Marathi Movie)

दिग्दर्शक अनिकेत रुमडे चित्रपटाच्या घोषणेबाबत म्हणतात, “या चित्रपटात दोन विद्यार्थ्यांचा शाळेतील जीवनाचा प्रवास वर्णन केला असून शाळेत प्रथम येण्यासाठी त्यांनी उचलेली पावले तसेच बोर्डाने डिजिटल पद्धतीचा अवलंब केल्यानंतर त्यांनी निवडलेला मार्ग आपल्याला बघायला मिळेल. तसेच या चित्रपटातून शाळकरी मुलांची हुशारकी, मस्ती, धमाल, धमक, निरागसता बघायला मिळेल. तुम्हाला शाळेतले दिवस आणि त्या दिवसातला गोडवा परत अनुभवायचा असेल तर हा चित्रपट नक्की बघण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here