Burglary : नगर : अहिल्यानगर जिल्ह्यासह सातारा, नाशिक, पुणे जिल्ह्यात घरफोडी (Burglary) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून गावठी कट्ट्यासह (Illegal Weapon) तब्बल २५० ग्रॅम सोन्यासह २४ लाख २६ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : कोतवाली पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा
तब्बल १६ ठिकाणी घरफोडी
या टोळीने तब्बल १६ ठिकाणी घरफोडी, दरोडा टाकल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. मिलींद ईश्वर भोसले (वय २८, रा.बेलगाव, ता.कर्जत, जि.अहिल्यानगर), सुनिता देविदास काळे (वय ३५, रा.नारायण आष्टा, ता.आष्टी, जि.बीड), एक विधीसंघर्षित बालक (वय १७), यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असता शुभम पप्पु काळे (रा.एम.आय.डी.सी. अहिल्यानगर), सोन्या ईश्वर भोसले (रा. बेलगांव, ता. कर्जत), संदीप ईश्वर भोसले, कुऱ्हा ईश्वर भोसले (रा. सदर (सर्व पसार) यांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
अवश्य वाचा : आता ‘या’ राष्ट्रीय महामार्गावरील प्रवास स्वस्त होणार;सरकारची घोषणा
खात्रीशीर माहितीनुसार कारवाई (Burglary)
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांना मिळालेल्या माहितीनुसार संगमनेर तालुक्यात घरफोडी करणारा संशयित आरोपी हा कर्जत येथे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून गावठी कट्टा, तीन जिवंत काडतूस असा एकूण २४ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या टोळीत सराईत गुन्हेगार असून त्यांनी विविध जिल्ह्यात १६ ठिकाणी घरफोड्या केल्या असल्याचे समोर आले आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक तुषार धाकराव व पोलीस अंमलदार गणेश धोत्रे, फुरकान शेख, भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, बाळासाहेब खेडकर, सुनील मालणकर, भगवान थोरात, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे, भगवान धुळे व भाग्यश्री भिटे यांच्या पथकाने केली.