Burglary : नगर : शहरातील कल्याण रस्त्यावरील शिवाजीनगर परिसरात एका प्राध्यापकाच्या बंद घराचे कुलूप तोडून (Burglary) चोरट्यांनी सुमारे २ लाख २० हजार रूपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना समोर आली आहे. ही घटना ४ ते ६ जुलै दरम्यान घडली असून, अज्ञात चोरट्यांविरूध्द (Thief) सोमवारी (ता. ७) तोफखाना पोलीस (Police) ठाण्यात गुन्हा (Crime) दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा : ‘मीरा भाईंदर राड्यासाठी सर्वस्वी फडणवीस जबाबदार’-सुप्रिया सुळे
फिर्यादी प्राध्यापक म्हणून कार्यरत
याप्रकरणी प्रा. अविनाश मच्छिंद्र हंडाळ (वय ३६. रा. शिवाजीनगर, कल्याण रस्ता, अहिल्यानगर, मुळ रा. भातकुडगाव, ता. शेवगाव) यांनी फिर्याद दिली आहे. ते छत्रपती अभियांत्रिकी महाविद्यालय, नेप्ती (ता. अहिल्यानगर) येथे प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तर त्यांची पत्नी स्वाती या अहिल्यानगर शहरातील पेमराज सारडा कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत.
नक्की वाचा : ‘मराठी माणसं आमच्या पैशावर जगतात’, निशिकांत दुबेंच्या वक्तव्यावर देवेंद्र फडणवीस यांची पहिली प्रतिक्रिया
२ लाख २० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरी (Burglary)
शुक्रवारी (ता.४) रोजी सायंकाळी हंडाळ हे आपल्या आजारी मुलाच्या कारणास्तव भातकुडगाव येथे आपल्या मूळ घरी गेले होते. यावेळी त्यांनी घर व्यवस्थित लॉक केले होते. मात्र, रविवारी (ता.६) रोजी सायंकाळी ७ वाजता शेजारी राहणाऱ्या अंकुश बेरड यांनी त्यांना फोन करून घराचा दरवाजा उघडा असल्याची माहिती दिली. त्यानंतर त्यांनी तत्काळ गावाहून परत येऊन घरी पाहणी केली असता, दरवाजाचे कुलूप तोडलेले होते आणि घरात उचकापाचक झालेली होती. चोरट्यांनी घरातील बेडमध्ये ठेवलेल्या कपाटातून १ लाख ६० हजाराची रोख रकम, सोने असा एकूण २ लाख २० हजार रूपये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची फिर्यादीत म्हटले आहे.