Burglary : घरफोडी करणारी टोळी जेरबंद; पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Burglary : घरफोडी करणारी टोळी जेरबंद; पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

0
Burglary : घरफोडी करणारी टोळी जेरबंद; पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत
Burglary : घरफोडी करणारी टोळी जेरबंद; पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत

Burglary : नगर : अहिल्यानगर शहरातील सावेडी (Savedi) उपनगरात घरफोडी (Burglary) करणारी टोळी तोफखाना पोलिसांनी (Tofkhana Police Station) जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून तब्बल पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

अवश्य वाचा : रेव्ह पार्टी म्हणजे काय?आरोप सिद्ध झाल्यास काय होते शिक्षा?

संशयित आरोपींची नावे

कैलास चिंतामण मोरे (रा.सोनगीर, जि.धुळे), जयप्रकाश राजाराम यादव (रा.दिनदासपुर, जि.वाराणसी, उत्तर प्रदेश), रवींद्र आनंद माळी (रा-सोनगीर, जि.धुळे), सुनील ईश्वरर सोनार (रा.बालाजीनगर, शिंगावे, जि.धुळे), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : अवैध दारू विक्रीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई; सहा महिन्यांत ८९५ गुन्हे दाखल

पथकाने सापळा रचून आरोपींना घेतले ताब्यात (Burglary)

तोफखाना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंद कोकरे यांना मिळाल्या माहितीनुसार सावेडी परिसरात घरफोडी करणाऱ्या कैलास मोरे याने त्याच्या साथीदारांसह हा गुन्हा केला असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पाच लाख ४५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला.

ही कारवाई नगर शहराचे पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल भरती यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आनंद कोकरे, सहायक पोलीस निरीक्षक कल्पना चव्हाण, पोलीस बाळासाहेब गिरी, गोरख काळे, दीपक गांगर्डे, भानुदास खेडकर, सुधीर खाडे, सुरज वाबळे, रमेश शिंदे, सुमित गवळी, सतीश त्रिभुवन, भागवत बांगर यांच्या पथकाने केली.