Burglary : व्यावसायिकाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Burglary : व्यावसायिकाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

0
Burglary : व्यावसायिकाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास
Burglary : व्यावसायिकाचे बंद घर फोडून सोन्या-चांदीचे दागिने लंपास

Burglary : नगर : गावी गेलेल्या व्यावसायिकाचे घर चोरट्यांनी फोडून (Burglary) सोन्या चांदीचे दागिने व घरगुती साहित्य असा ५० हजारांचा मुद्देमाल चोरून (Theft) नेल्याची घटना समोर आली आहे. ही घटना शहरातील बोरूडे मळा परिसरात घडली आहे. याबाबत पवनेश बाळासाहेब चव्हाण (रा. अमृतकलश अपार्टमेंट, बोरूडे मळा) यांनी शनिवारी (ता. ३०) ऑगस्ट रोजी रात्री दिलेल्या फिर्यादीवरून तोफखाना पोलीस ठाण्यात (Tofkhana Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा : तामिळनाडूमध्ये ७२ टक्के आरक्षण होऊ शकते,तर महाराष्ट्रात का नाही ?- शरद पवार

घराचे कुलूप व कडी कोंडा तोडलेले आले दिसून (Burglary)

फिर्यादी पवनेश चव्हाण हे २६ ऑगस्ट रोजी रात्री आपल्या कुटुंबासह मुळगाव सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यात गेले होते. ३० ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजून तीस मिनिटांच्या सुमारास शेजारी राहणारे संजय तुकाराम शिंदे यांनी त्यांना फोनवर कळवले की चव्हाण यांच्या बंद घराचे कुलूप तुटलेले आहे. त्यामुळे ते आपल्या चारचाकी वाहनातून दुपारी तीन वाजता घरी परतले. घराचे कुलूप व कडी कोंडा तोडलेले दिसून आले. सर्व सामान अस्ताव्यस्त अवस्थेत आढळले. लॉक केलेल्या बॅगाही उचकापाचक केल्या असून त्यातून सोन्या चांदीचे दागिने असा एकूण ५० हजार रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here