Burglary : नगर : शहरातील आगरकर मळा परिसरात चोरट्यांनी एका बंद घराला लक्ष करत दीड लाख रुपयांच्या सोन्याच्या दागिन्यांवर हात साफ केल्याची घटना उघडकीस आली आहे. सलग काही दिवस घर बंद असल्याची संधी साधत चोरट्यांनी हा डल्ला मारला. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात चोरट्याविरुद्ध (Thieves) घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नक्की वाचा : महानगरपालिकेच्या प्रभाग रचनेतील एक हरकत अंशतः मान्य; आयुक्त तथा प्रशासक यशवंत डांगे यांची माहिती
१ लाख ५४ हजारांचा ऐवज चोरीला
अमितकुमार श्रीवास्तव (वय ४५, रा. रंजनानगर, आगरकर मळा) यांनी फिर्याद दिली आहे. श्रीवास्तव हे १४ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजता कुटुंबासह बालाजी येथे देवदर्शनाला गेले होते. त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्याने याच संधीचा फायदा घेत त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचा कडी-कोयंडा तोडला. त्यानंतर घरात प्रवेश करून कपाटातील मौल्यवान ऐवज असा एकूण १ लाख ५४ हजार ५०० रुपयांचा ऐवज चोरीला गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
अवश्य वाचा : कर्मचारी महिलेला ५० हजारांचा गंडा; अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल
कोतवाली पोलीस ठाण्यात दिली फिर्याद (Burglary)
श्रीवास्तव हे बालाजी येथे असताना त्यांना घरफोडीची माहिती मिळाली ते २० ऑक्टोबर रोजी घरी परतल्यानंतर हा संपूर्ण प्रकार त्यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्यांनी तत्काळ कोतवाली पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली.



