Burglary : बुरूडगाव रस्त्यावरील घरफोडी; २७ तोळे लंपास, गुन्हा दाखल

Burglary : बुरूडगाव रस्त्यावरील घरफोडी; २७ तोळे लंपास, गुन्हा दाखल

0
Burglary : बुरूडगाव रस्त्यावरील घरफोडी; २७ तोळे लंपास, गुन्हा दाखल
Burglary : बुरूडगाव रस्त्यावरील घरफोडी; २७ तोळे लंपास, गुन्हा दाखल

Burglary : नगर : शहरातील बुरूडगाव रस्ता परिसरात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्याचे बंद घर फोडून (Burglary) अज्ञात चोरट्यांनी (Thief) सुमारे २७ तोळ्याचे सोन्याचे व ४० ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि २२ हजाराची रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अवश्य वाचा: दुबार मतदान कसं रोखलं जाणार? निवडणूक आयोगाने सांगितला प्लॅन

बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर होते बंद

पांडुरंग नागु धोत्रे (वय ६७, रा.बुरूडगाव रस्ता, अहिल्यानगर) यांनी याप्रकरणी फिर्याद दिली आहे. धोत्रे हे सैन्यदलातून सुभेदार पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. धोत्रे २६ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२५ दरम्यान बाहेरगावी गेल्यामुळे त्यांचे घर बंद होते. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या घराच्या मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.

नक्की वाचा : नगरपालिका,नगरपंचायतींच्या निवडणुकीचा बिगुल वाजला;आचारसंहिता लागू

९ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमालाची चाेरी (Burglary)

घरातील कपाटामध्ये ठेवलेले सोन्याचे सुमारे २७ तोळ्याचे दागिने, ४० ग्रॅमचे चांदीचे दागिने आणि कपाटात ठेवलेली २२ हजार रूपयांची रोख रक्कम असा एकूण ९ लाख ३९ हजार रूपयांचा मुद्देमाल चोरट्यांनी चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी पथकासह घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक शितल मुगडे या करत आहेत.