Burglary : घरफोडीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

Burglary : घरफोडीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

0
Burglary : घरफोडीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई
Burglary : घरफोडीतील आरोपी जेरबंद; स्थानिक गुन्हे शाखेचे कारवाई

Burglary : नगर : नेवासा तालुक्यातील पुनतगाव येथे घरफोडी (Burglary) करणाऱ्या संशयित आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने ताब्यात घेतले आहे. सचिन भाऊसाहेब काळे (वय २२,रा. लखमापुरी, ता. शेवगाव, जि. अहिल्यानगर), असे ताब्यात घेतलेल्या संशयित आरोपीचे (Accused) नाव आहे.

अवश्य वाचा: आगामी निवडणुकीत महायुतीचा झेंडा फडकवायचा आहे : विखे पाटील

सापळा रचून आरोपीला घेतले ताब्यात

त्याच्याकडे अधिक चौकशी केली असता त्याने त्याचा साथीदार राहुल शिरसाठ भोसले (रा. पिंपळवाडी ता. गंगापुर जि. छत्रपती संभाजीनगर), दोघांनी मिळून केला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांना मिळालेल्या माहितीनुसार पुनतगाव येथे घरफोडी करून तीन लाख ८८ हजारांचा मुद्देमाल चोरणारा सचिन काळे असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले.

नक्की वाचा : एकाच दिवशी चार जणांची आत्महत्या; पाथर्डी तालुका हादरला

यांच्या पथकाने केली कारवाई (Burglary)

ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक हरिष भोये व पोलीस अंमलदार फुरकान शेख, दीपक घाटकर, बाळासाहेब नागरगोजे, रिचर्ड गायकवाड, सोमनाथ झांबरे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, प्रशांत जाधव महिला पोलीस अंमलदार भाग्यश्री भिटे, ज्योती शिंदे यांच्या पथकाने केली.