Burglary : भरदिवसा घरफोडी; २ लाख ६६ हजारांच्या दागिन्यांची चोरी

Burglary : भरदिवसा घरफोडी; २ लाख ६६ हजारांच्या दागिन्यांची चोरी

0
Burglary : भरदिवसा घरफोडी; २ लाख ६६ हजारांच्या दागिन्यांची चोरी
Burglary : भरदिवसा घरफोडी; २ लाख ६६ हजारांच्या दागिन्यांची चोरी

Burglary : नगर : अहिल्यानगर तालुक्यातील घोसपुरी येथे भरदिवसा महिलेच्या घरात घुसून बॅगेत ठेवलेले २ लाख ६६ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची (Burglary) घटना घडली आहे. याबाबत तालुका पोलीस ठाण्यात (Taluka Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (Crime Registered) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : महाराष्ट्र दुष्काळमुक्त करण्याचा मानस : पालकमंत्री विखे

तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद

याबाबत रंजना साहेबराव घोडके (वय ६०, रा. घोडकेवाडी, घोसपुरी, हल्ली रा. वाघोली, पुणे) यांनी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी या मुलाच्या कामानिमित्ताने सध्या वाघोली, पुणे येथे वास्तव्यास आहेत. त्यांच्या मुलाचे लग्न असल्याने गावाकडील धार्मिक विधी, सुवासिनी जेऊ घालणे आदी करण्यासाठी त्या घोडकेवाडी येथे आल्या होत्या.

अवश्य वाचा : मनोज जरांगे पाटील यांना जीवे मारण्याची धमकी; दोन संशयित ताब्यात

नजर चुकवून घरात चाेरी (Burglary)

४ नोव्हेंबर रोजी दुपारी १२ ते सायंकाळी ६ या कालावधीत त्या धार्मिक विधी करण्यात व्यस्त असताना अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरात घुसून त्यांची नजर चुकवून घरातील बॅगेत ठेवलेले २ लाख ६६ हजारांचे सोन्याचांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज चोरून नेला. सायंकाळी हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी नगर तालुका पोलीस ठाण्यात धाव घेत माहिती दिली. या फिर्यादी वरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जयेश गांगुर्डे हे करत आहेत.