Burglary : कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू

Burglary : कोपरगाव शहरात घरफोडीचे सत्र पुन्हा सुरू

0
Burglary

Burglary : कोपरगाव : शहरात थांबलेले घरफोडीचे (Burglary) सत्र पुन्हा सुरू झाले आहे. शहरात एकाच दिवशी दोन ठिकाणी अज्ञात चोरट्यांनी (Thief) घरफोडी करत सोन्याचे दागिने, रोख रक्कम व दोन मोबाईल (Mobile) असा एकूण जवळपास अडीज लाख रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

हे देखील वाचा: संविधान बदलण्याची कोणाचीही हिंमत नाही: मंत्री रामदास आठवले

दोन लाखांचा ऐवज चोरीला

कोपरगाव शहरातील साईसिटी परिसरातील साई गंगोत्री अपार्टमेंट मधील आशिष श्रीराम पारडे यांच्या राहत्या घराचे कुलुप तोडुन घरात प्रवेश करत कपाटाची उचकपाचक केली. सुमारे दोन लाख रुपये किंमतीचे साडेसात तोळ्याचे विविध सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत.

नक्की वाचा: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते झाले देशातील पहिल्या अंडरवॉटर मेट्रोचं उद्घाटन

रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण ५९ हजारांचा मुद्देमाल (Burglary)


तसेच दुसरी घरफोडीची घटना ६ मार्च रोजी पहाटे सव्वा पाचे ते सहा वाजेच्या दरम्यान कोपरगाव शहरातील बैलबाजार रोड येथील कृषीमित्र मंडळ सहकारी गृह निर्माण संस्था येथे घडली. येथील रायभान तुकाराम भवर यांच्या घराची अज्ञात चोरट्यांनी कडी उघडून घरात प्रवेश करत घरातील कपाटाची उचका पाचक करत रोख रक्कम व दोन मोबाईल असा एकूण ५९ हजारांचा मुद्देमाल लंपास केला. वरील दोन्ही घरफोडी प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here