Burglary : नगर : भिंगार उपनगरातील सदर बाजार भागात किराणा दुकानातून अज्ञात चोरट्यांनी दोन लाख ५० हजार रूपयांची रोकड आणि सोन्या-चांदीचे दागिने असा सुमारे पाच लाख रूपये किमतीचा ऐवज चोरून (Theft) नेल्याची घटना समोर आली आहे. याबाबत भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात (Bhingar Camp Police Station) अज्ञात चोरट्याविरोधात घरफोडीचा (Burglary) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: राहुरी तालुक्यात जुगार अड्ड्यावर छापा; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई
पाच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास
मनिष छत्तुमल मेवाणी (वय ३१, रा. सदर बाजार, भिंगार) यांनी फिर्याद दिली आहे. मनिष मेवाणी यांचे सदर बाजार येथे शिवशंकर किराणा स्टोअर्स नावाचे दुकान आहे. चोरट्यांनी दुकान फोडून आत प्रवेश केला. सामानाची उचकापाचक केली. काऊंटरमधून २ लाख ५० हजार रूपयांची रोकड, ५० ग्रॅम वजनाचे सोन्याचे बिस्कीट आणि प्रत्येकी एक किलो वजनाच्या दोन चांदीच्या विटा असा एकूण पाच लाख रूपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.
नक्की वाचा : निंबळक परिसरात कोयत्याचा धाक दाखवून दहशत करणारा जेरबंद
घरफोडीचा गुन्हा दाखल (Burglary)
याबाबत मेवाणी यांनी भिंगार कॅम्प पोलिसांना माहिती दिली व २७ डिसेंबर रोजी पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्यानंतर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक गजेंद्र इंगळे करत आहेत.



