Burglary : नगर : एमआयडीसी परिसरात (MIDC area) असलेल्या पितळे कॉलनीमध्ये धाडसी घरफोडीची (Burglary) घटना उघडकीस आली आहे. अज्ञात चोरट्याने घराचे कुलूप तोडून घरातील रोख रकमेसह सोन्याचे दागिने असा एकूण ४ लाख ६० हजार १०० रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात (MIDC Police Station) अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अवश्य वाचा: युवा सेना जिल्हाप्रमुख आकाश कातोरे व शहरप्रमुख महेश लोंढे यांची पक्षातून हकालपट्टी
७२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम
याबाबत संजीवनी संजय भुसारी (वय ४५, पितळे कॉलनी, एमआयडीसी) यांनी फिर्याद दिली आहे, फिर्यादी भुसारी या २९ डिसेंबर रोजी सकाळी घराला कुलूप लावून बाहेर गेल्या होत्या. याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्याने घराच्या मुख्य गेटचे कुलूप आणि साखळी तोडून आत प्रवेश केला. चोरट्याने घरातील ७२ हजार ६०० रुपयांची रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने चोरून नेले.
नक्की वाचा : अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक प्रक्रियेचा मुख्य निवडणूक निरीक्षक यांच्याकडून आढावा
अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल (Burglary)
दुसऱ्या दिवशी फिर्यादी घरी परतल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश केल्यावर कपाटातील साहित्य विस्कटलेले होते आणि दागिने गायब असल्याचे लक्षात आले. त्यांनी तातडीने एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.



