Burglary : नगर : कर्जत परिसरात घरफोडी (Burglary) करणारे दोन आरोपी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. कोहिनूर जवान काळे (वय २२, रा. शेडगाव फाटा, ता. श्रीगोंदा) व अशोक बबन भोसले (रा. कासारी, ता. आष्टी, जि. बीड) असे जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत. या आरोपींनी केलेले तीन गुन्हे उघड झाले आहेत.
नक्की वाचा: अबब! नगर लाेकसभा निवडणुकीच्या आखाड्यात एकाच नावाचे दाेन उमेदवार
दोन लाख ५७ हजारांच्या दागिन्यांची चोरी (Burglary)
कर्जत तालुक्यातील जलालपूर शिवारात राघू लकडे यांच्या घराच्या बंद दाराचा कडी कोयंडा तोडून चोरांनी घरात प्रवेश करत दोन लाख ५७ हजार रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरून नेले होते. ही घटना एक एप्रिलला घडली होती. या संदर्भात लकडे यांनी कर्जत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या संदर्भात पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पथक करत होते.
हे देखील वाचा: आरक्षणाच्या विरोधकांना पूर्ण ताकदीने पाडा; मनोज जरांगे पाटलांचे मराठ्यांना आवाहन
एक लाख १८ हजारांचा मद्देमाल हस्तगत (Burglary)
पथकाला माहिती मिळाली की, जलालपूर येथील घरफोडीचा गुन्हा कोहिनूर काळे व त्याच्या साथीदारांनी केला आहे. तो जलालपूर येथील बस स्टँडवर येणार आहे. त्यानुसार पथकाने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. त्याच्या अंगझडतीत १० हजार रुपये आढळून आले. तर त्याचा साथीदार जग्गू भोसले पसार झाला. जग्गू व कोहिनूरने मिळून जलालपूर व राशीन येथे घरफोडी केली. या घरफोडीतील सोने-चांदीचे दागिने अशोक भोसलेला विकल्याचे कोहिनूरने पथकाला सांगितले. त्यानुसार पथकाने अशोक भोसलेला ताब्यात घेतले. पथकाने दोन्ही आरोपींकडून एक लाख १८ हजार रुपयांचा मद्देमाल पथकाने हस्तगत केला. यात १२ ग्रॅम वजनाचे सोन्याचे व ३० भाराचे चांदीचे दागिने तसेच १० हजार रुपये रोख रकमेचा समावेश आहे.