Burglary : जांब येथे घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी गजाआड

Burglary : जांब येथे घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी गजाआड

0
Burglary : जांब येथे घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी गजाआड
Burglary : जांब येथे घरफोडी करणारे दोन सराईत आरोपी गजाआड

Burglary : नगर : जांब (ता. नगर) येथे घरफोडी (Burglary) करून पाच लाख ७३ हजार ४०० रुपये किमतीचे सोने-चांदीचे दागिने चोरांनी लंपास केले होते. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने दोन सराईत आरोपींना (Accused) एक लाख १५ हजार रुपयांच्या मुद्देमालासह जेरबंद केले. तुषार हबाजी भोसले (वय २३, रा. पिंपरखेड, ता. आष्टी, जि. बीड) व कानिफ उद्धव काळे (वय २२, रा. वाकी, ता. आष्टी, जि. बीड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.

नक्की वाचा : ‘मनोज जरांगेंचा अभ्यास कमी,मुस्लिम समाजाला २५ वर्षांपूर्वीच ओबीसीतून आरक्षण’- छगन भूजबळ

५ लाख ७३ हजारांच्या दागिन्यांची चोरी

जांब येथे दत्तात्रेय पवार हे त्यांच्या घराच्या मागील बाजूस असलेल्या शेतात कुटुंबासह काम करत होते. त्यावेळी कोणी तरी त्यांच्या घराच्या दरवाजाचा कडी कोयंडा तोडून घरात प्रवेश केला. घरातील पाच लाख ७३ हजार ४०० रुपयांचे सोने-चांदीचे दागिने चोरांनी लंपास केले. या प्रकरणी दत्तात्रेय पवार यांच्या फिर्यादीवरून नगर तालुका पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.

अवश्य वाचा : गुडन्यूज! जूनमधील मान्सून आता जुलैमध्ये बरसणार

तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपींचा शोध (Burglary)

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी या प्रकरणाचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला होता. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी तांत्रिक पुराव्यांच्या आधारावर आरोपींचा शोध सुरू केला. त्यावेळी त्यांना माहिती मिळाली की, हा गुन्हा तुषार भोसले व कानिफ काळे या सराईत आरोपींनी केला आहे. हे दोन्ही आरोपी चोरीचे दागिने घेऊन नगर-जामखेड रस्त्यावरील मुठ्ठी चौक येथे येणार आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता आरोपींकडे एक लाख पाच हजार रुपये किमतीचे १५ ग्रॅम सोन्याचे गंठण व १० हजार रुपये रोख, असा एक लाख १५ हजार रुपयांचा मुद्देमाल मिळून आला. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना नगर तालुका पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. तुषार भोसलेवर यापूर्वी दरोडा, जबरी चोरी, घरफोडी असे २३ तर कानिफ काळेवर यापूर्वी दरोड्याची तयारी, दरोडा व खून असे गंभीर स्वरूपाचे तीन गुन्हे दाखल आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here