Burglary : मतिमंद विद्यालयात चोरी करणारे आरोपी गजाआड

Burglary : मतिमंद विद्यालयात चोरी करणारे आरोपी गजाआड

0
Burglary : मतिमंद विद्यालयात चोरी करणारे आरोपी गजाआड
Burglary : मतिमंद विद्यालयात चोरी करणारे आरोपी गजाआड

Burglary : नगर : संगमनेर तालुक्यातील वेल्हाळे येथील मतिमंद विद्यालयात घरफोडी (Burglary) करणाऱ्या तीन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. सुमित रमेश उडीतके (वय २५, रा. अमृतनगर साखर कारखाना कॉलनी, संगमनेर), प्रेम विजय वाल्हेकर (वय २२, रा. आठरा पगड, गुंजाळवाडी, ता. संगमनेर) व शुभम धिरज पारचे (वय २६, रा. अमृतनगर, संगमनेर) अशी जेरबंद आरोपींची (Accused) नावे आहेत.

नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम

दोन लाख ५४ हजारचा मुद्देमाल लंपास

दसरा सणानिमित्त वेल्हाळे येथील मतिमंद शाळेतील कार्यालयाला सुटी होती. याचा फायदा घेत चोरांनी लिपिक कार्यालयाच्या दरवाजाचे कुलूप तोडत कार्यालयातील दोन लाख ५४ हजार ४५७ रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या प्रकरणी प्रवीण थोरात यांच्या फिर्यादीवरून संगमनेर शहर पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला.

अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे

गुप्त बातमीदारामार्फत माहिती (Burglary)

जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेला समांतर तपास करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळाला भेट दिली. घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेज तपासले. तसेच संगमनेर हद्दीतील गुन्हेगारांची माहिती घेतली. पथकाला मंगळवारी (ता. १५) गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, प्रेम वाल्हेकर व त्याच्या साथीदारांनी ही घरफोडी केली आहे. प्रेम व त्याचे साथीदार साखर कारखाना कॉलनीत आहेत. त्यानुसार पथकाने सापळा रचून तीन आरोपींना ताब्यात घेतले. पथकाने आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

पथकाने जेरबंद आरोपीची झडती घेतली असता त्यांच्याकडून एक लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. पथकाने पुढील तपासासाठी आरोपींना संगमनेर शहर पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.