Burglary : नगर : पाथर्डी व शेवगाव परिसरात घरफोडी (Burglary) करणाऱ्या दोन सराईत आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केले. पथकाने आरोपींकडून (Accused) तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. सचिन ईश्वर भोसले (वय २१, रा. बेलगाव, ता. कर्जत) व सचिन बंबळ्या काळे (वय २१, रा. नागझरी, ता. गेवराई, जि. बीड) अशी जेरबंद आरोपींची नावे आहेत.
अवश्य वाचा: मी स्वत: मराठा समाजाला आरक्षण देणार : एकनाथ शिंदे
घरफोडीचा गुन्हा दाखल
पाथर्डी तालुक्यातील कासार पिंपळगाव येथील बाळासाहेब भगत व त्यांचे कुटुंब २८ सप्टेंबरला बाहेरगावी गेले होते. चोरांनी पाळत ठेऊन त्यांच्या घरी चोरी करत कपाटातील एक लाख तीन हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. या संदर्भात बाळासाहेब भगत यांच्या फिर्यादीवरून पाथर्डी पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून घेतला होता.
नक्की वाचा: आचारसंहिता म्हणजे काय? वाचा,आचारसंहितेचे नियम
सापळा लावून आरोपींना घेतले ताब्यात (Burglary)
या घटनेचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केला. पथकाला माहिती मिळाली होती की, हा गुन्हा सचिन भोसले व त्याच्या साथीदारांनी केला आहे. ते पाथर्डी वरुन अहिल्यानगरला येणार आहेत. त्यानुसार पथकाने सापळा लावून अहिल्यानगरमधील बेल्हेश्वर चौकात आरोपींना ताब्यात घेतले. त्यांचे दोन साथीदार मात्र, पसार झाले. गहिन्या ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत) व भगवान ईश्वर भोसले (रा. बेलगाव, ता. कर्जत) अशी पसार आरोपींची नावे आहेत. पथकाने जेरबंद आरोपींच्या झडतीत तीन लाख सहा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. पथकाने आरोपींकडे अधिक विचारपूस केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. पथकाने पुढील तपासासाठी जेरबंद आरोपींना पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले आहे.