Burglary : नगर : शेवगाव, पाथर्डी तालुक्यात घरफोडी (Burglary) करणारी टोळी स्थानिक गुन्हे शाखेच्या (Local Crime Branch) पथकाने जेरबंद केली आहे. त्याच्याकडून ९ गुन्ह्याचा उलगडा करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. तसेच २ लाख १७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
नक्की वाचा : साखर कारखानदार व शेतकरी संघटनेचे प्रतिनिधी यांची बैठक निष्फळ
दागीने छत्रपती संभाजीनगर येथे विकल्याचे उघड
विनोद सक्या भोसले, (वय २५, रा.निपाणी जळगाव, ता.पाथर्डी), सचिन भाऊसाहेब काळे, (वय २१, रा.लखमापुरी, ता.शेवगाव), असे ताब्यात घेतलेल्या आरोपीचे नाव आहे. तसेच या गुन्ह्याबाबत अधिक चौकशी केली असता सदाचा गुन्हा विकास विठ्ठल भोसले, (रा.उमापूर, ता.गेवराई, जि.बीड) याचे मदतीने केला असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच गुन्हयातील चोरलेले काही सोन्याचे दागीने हे लक्ष्मीकांत सांडुशेठ मुंडलिक, (रा.सोनार गल्ली, बिडकीन, ता.पैठण, जि.छ.संभाजीनगर) यास विकल्याचे तपासात पुढे आले आहे.
अवश्य वाचा : सावधान!२१ डिसेंबरपासून अवकाळी पावसाची शक्यता
अधिक तपासासाठी पाथर्डी पोलिसांच्या दिले ताब्यात (Burglary)
आरोपी व त्यांचा साथीदार विकास विठ्ठल भोसले यांचेसह मागील दोन-तीन महिन्यात पाथर्डी व शेवगाव तालुक्यात वेगवेगळया घरफोडीचे गुन्हे केले असल्याचे समोर आले आहे. याबाबत अधिक तापासाठी पाथर्डी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने केली.