Burglary : श्रीरामपूरमध्ये चार ठिकाणी घरफोड्या

Burglary : श्रीरामपूरमध्ये चार ठिकाणी घरफोड्या

0
Burglary : श्रीरामपूरमध्ये चार ठिकाणी घरफोड्या
Burglary : श्रीरामपूरमध्ये चार ठिकाणी घरफोड्या

Burglary : श्रीरामपूर : श्रीरामपूर- संगमनेर रस्त्यावरील दत्तनगर परिसरातील हमरस्त्यालगत असलेल्या आगाशेनगर येथे एकाच रात्री अज्ञात चोरट्यांनी चार घरफोड्या (Burglary) केल्याने परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. याप्रकरणी श्रीरामपूर (Shrirampur) शहर पोलीस (Police) ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल (Crime filed) करण्यात आला आहे.

नक्की वाचा : लव्ह जिहाद, धर्मांतर व लँड जिहाद रोखण्यासाठी नाथ जागृती यात्रा : योगी बालकनाथ महाराज

याबाबत अधिक माहिती अशी,

महसूल विभागाचे माजी अधिकारी सतीश पाटोळे यांच्या बंद असलेल्या घराचा शुक्रवारी (ता. १०) मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी कडीकोयंडा तोडून घरातील रोख रक्कम ५० हजार रुपये व दीड तोळे सोन्याची चैन असा साधारण पावणे दोन लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे.

अवश्य वाचा : अखेर धनंजय देशमुख यांचं आंदोलन मागे!

अज्ञात चोरट्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल (Shrirampur)

सतीश पाटोळे हे पुण्याला आपल्या मुलाकडे गुरुवारी (ता. ९) कामानिमित्त गेले होते. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी हात साफ करत घरातील मुद्देमाल लंपास केला आहे. सकाळी नियमितपणे घरकाम करणारी महिला पाटोळे यांच्या घरासमोर आल्यानंतर दार उघडे पाहून मोठ्याने आवाज दिला. मात्र, पाटोळे कुटुंब घरात नसल्याने महिलेला कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने घरकाम करणाऱ्या महिलेने काही अंतरावर राहत असलेले विपुल शेलार यांना कळवले. यावेळी शेलार यांनी पाटोळे कुटुंबियांना भ्रमणध्वनीद्वारे कळवले की, तुमच्या घराचा कडी-कोयंडा तोडलेला आहे. यावेळी पाटोळे यांनी आपल्या नातेवाईकाला भ्रमणध्वनीद्वारे सांगून निवासस्थानी जाण्यास सांगितले. दरम्यान विपुल शिलार यांनी सदर घटनेची माहिती पोलिसांना कळविली. माहिती मिळताच पोलिस फौजफाट्यासह पाटोळे यांच्या निवासस्थानी दाखल झाले व घटनेचा पंचनाम केला. यावेळी पोलीस निरीक्षक देशमुख यांनी श्वानपथक व ठसेतज्ज्ञ यांना पाचारण करून तपासाचे चक्र फिरवले. पुण्याहून दुपारी दोन वाजता संपूर्ण पाटोळे कुटुंब आपल्या निवासस्थानी दाखल झाले. याप्रकरणी सतीश पाटोळे यांनी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरोधात दिलेल्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल केला. त्याच रात्री अज्ञात चोरट्यांनी आपला मार्चा परिसरातील पंडित, शेळके, अभंग यांच्या घराकडे वळवून त्या ठिकाणाहून दुचाकी वाहनांसह अन्य वस्तू लंपास केल्या. चोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाले आहेत.