Burhan Nagar : मानाच्या पालखीचे बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तिभावाने स्वागत

Burhan Nagar : मानाच्या पालखीचे बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तिभावाने स्वागत

0
Burhan Nagar : मानाच्या पालखीचे बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तिभावाने स्वागत
Burhan Nagar : मानाच्या पालखीचे बुऱ्हाणनगरच्या तुळजाभवानी मंदिरात भक्तिभावाने स्वागत

Burhan Nagar : नगर : शारदीय नवरात्रोत्सवासाठी (Shardiya Navratri Festival) नगरहून श्री क्षेत्र तुळजापुरला (Shri Kshetra Tuljapur) जाणाऱ्या तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीचे आगमन बुऱ्हाणनगर (Burhan Nagar) येथील श्री अंबिका तुळजाभवानी देवी मंदिरात उत्सहात झाले.  बुधवारी (ता.२४) सकाळी हजारो भाविकांच्या उपस्थितीत भक्तिपूर्ण वातावरणात ही मानाची पालखी वाजतगाजत व गुलालाची उधळण करत मंदिर परिसरात ठेवण्यात आली. यावेळी दर्शनास आलेल्या हजारो भाविकांनी आईराजा उदो उदो…, सदानंदीचा उदो उदो…, बोल तुळजाभवानी माताकी जय… असा जयघोष केला.

अवश्य वाचा: लैंगिक अत्याचार करणाऱ्या आरोपीच्या क्रूरतेचा कळस; खून करून मृतदेह पुरल्याचे तपासात उघड

पालखीचे वंशपरंपरागत मानकरी भगत कुटुंबीयांकडून पालखीचे उत्साहात व भक्तिभावाने स्वागत व पूजन करण्यात आले. मुख्य पुजारी ॲड.विजय भगत, दुर्गा भगत यांनी पालखीची आरती करून साडीचोळी अर्पण केली. तिसऱ्या माळे निमित्त बुऱ्हाणनगर मध्ये बुधवारी यात्रा भरली होती. तुळजाभवानी देवीच्या मानाच्या पालखीच्या देवी मंदिरास ५ प्रदक्षिणा झाल्यावर पालखीची बुऱ्हाणनगर गावातून वाजतगाजत देवीच्या जयघोषात मिरवणुक काढण्यात आली. यावेळी हजारो भाविक उपस्थित होते.

नक्की वाचा : लाडक्या बहिणींनी ई-केवायसी प्रक्रिया कशी करावी ? जाणून घ्या सविस्तर…

घरोघरी पालखीची भक्तिभावाने पूजा

बुऱ्हाणनगर गावत पालखीचे स्वागत करण्यासाठी सर्व घरासमोर आकर्षक रांगोळ्या रेखाटून घरोघरी पालखीची भक्तिभावाने पूजा करण्यात आली. तत्पूर्वी तिसऱ्या माळे निमित्त सकाळी तुळजाभवानी देवीची विधिवत महापूजा पुजारी भगत परिवाराने केली. यावेळी शहरातील विविध वृत्तपत्रांच्या संपादकांच्या व पत्रकारांच्या हस्ते आरती करण्यात आली. यावेळी देवीस परिधान केलेले उंची वस्त्रे, सुवर्ण व रजत अलंकार तसेच आकर्षक पुष्पमाळांमुळे देवीचे रूप अधिकच प्रसन्न व विलोभनीय दिसत होते. यात्रे निमित्त गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.

यावेळी पुजारी ॲड. अभिषेक भगत म्हणाले, (Burhan Nagar)

कुलस्वामिनी तुळजाभवानी देवीच्या पालखीचा मान गेल्या एक हजाराहून अधिक वर्षांपासून बुऱ्हाणनगरच्या भगत परिवाराकडे आहे. श्री क्षेत्र तुळजापूर येथे विजयादशमीला तुळजाभवानी देवीचे सीमोल्लंघन नगरहून गेलेल्या याच पालखीमधून दरवर्षी होत असते. आज तिसऱ्या माळेच्या उत्सवाला संपूर्ण राज्यातून मोठ्या प्रमाणात भाविक बुऱ्हाणनगर येथे आले आहेत. सर्व भाविकांची मनोकामना पूर्ण करणारी ही देवी असल्याने भाविकांची मोठी श्रद्धा देवीवर आहे. देवीच्या आशीर्वादाने सर्वत्र मंगलमय वातावरण निर्माण झाले आहे. यावेळी राजेंद्र भगत, कुणाल भगत, अंजली भगत, कविता भगत, किरण भगत, मनीषा भगत, सुभाष भगत, सुनंदा भगत, ऋषिकेश भगत, ॲड.अजिंक्य भगत, वैभवी भगत, कुणाल भगत, अंकिता भगत, ॲड. संकेत भगत, रोहन भगत, वेद व क्षताक्षि भगत उपस्थित होते.