Burning Car : निंबळक बायपासवर बर्निंग कारचा थरार

Burning Car : निंबळक बायपासवर बर्निंग कारचा थरार

0
Burning Car : निंबळक बायपासवर बर्निंग कारचा थरार
Burning Car : निंबळक बायपासवर बर्निंग कारचा थरार


Burning Car : नगर : निंबळक बायपास (Nimbalak Bypass) रस्त्यावरील एका छोट्या पुलावर कारला अचानक आग (Burning Car) लागली. आग लागल्याचे लक्षात आल्याने कारमधील चौघे खाली उतरले आणि अनर्थ टळला. मात्र, आगीत कार पूर्णपणे जळून खाक झाली. एमआयडीसीच्या (MIDC) अग्निशामक दलाने आग तत्काळ आटोक्यात आणली. ही घटना रविवारी (ता. ७) सायंकाळी साडेसात वाजता घडली.

नक्की वाचा : नगरच्या रेल्वे प्रकल्पांना गती द्या; खासदार नीलेश लंके यांचे रेल्वेमंत्र्यांना पत्र

धूर येत असल्याचे तत्काळ थांबवून सर्व जण वाहनातून बाहेर

टाकळीमियाँ येथील प्रतीक सगळगिळे (रा. टाकळीमिया) हे कुटुंबासह अहिल्यानगर येथून टाकळीमियाकडे जात होते. निंबळक बायपास महामार्गावरील छोट्या पुलाजवळ वाहनातून अचानक  धूर येत असल्याचे कारमध्ये बसलेल्या चौघांच्या लक्षात आले. त्यामुळे कार तत्काळ थांबवून सर्व जण वाहनातून बाहेर आले. त्यानंतर वाहनाने हळूहळू पेट घेत आगीच्या ज्वाळा वेगाने पसरल्या. काही वेळातच वाहन पूर्णपणे जळून खाक झाले.

अवश्य वाचा: जिल्हा प्रशासन व महापालिका सत्ताधाऱ्यांच्या दबावाखाली; अभिषेक कळमकर यांचा आरोप

वाहन जळत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा (Burning Car)

वाहनाने पेट घेतल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. वाहन जळत असल्याने रस्त्यावर वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. घटनास्थळी असलेल्यांनी घटनेची माहिती एमआयडीसीच्या अग्निशामक दलाला कळवली. अग्निशामक दलाचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळवले. या घटनेत सुदैवाने कोणतीही जीवित हानी झाली नाही. मात्र, वाहनाचे नुकसान झाले आहे.