नगर : उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग (Rudraprayag) येथे भीषण दुर्घटना घडली आहे. बद्रीनाथ महामार्गावरून जाणारा एक ट्रॅव्हलर बस अलकनंदा नदीत कोसळली (Traveler Bus Falls Into Alaknanda River) आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा मृत्यू (Two People Died) झाला असून आठ जणांना वाचवण्यात आलं आहे, तर सुमारे १० जण बेपत्ता आहेत. घटनास्थळी युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू असून एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
नक्की वाचा : मोठी बातमी!वर्षातून दोन वेळा होणार १० वीची बोर्ड परीक्षा;सीबीएसई बोर्डाचा निर्णय
प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली (Bus Falls Into Alanknanda River)
बसमध्ये चालक आणि कंडक्टरसह १९ लोक होते, त्यापैकी २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकाचा मृतदेह रुद्रप्रयाग संगममध्ये सापडला. अपघातातील मृतांच्या कुटुंबीयांना शासनाकडून आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. रुद्रप्रयाग येथे झालेल्या बस अपघातामुळे परिसरात शोककळा पसरली आहे. प्रशासनाकडून बचावकार्य जलद गतीने सुरू आहे. जखमी झालेल्या लोकांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर बेपत्ता लोकांचा शोध घेण्यासाठी बचाव पथकं नदीत शोध घेत आहेत.
अवश्य वाचा : मोठी बातमी!शुभांशू शुक्लांसह ४ अंतराळवीर अंतराळ स्थानकाकडे झेपावले
दुर्घटनेची चौकशी सुरु (Bus Falls Into Alanknanda River)
मिळालेल्या माहितीनुसार, ही दुर्घटना घोलतीर गावाजवळ झाली. प्रत्यक्षदर्शींनी ही बस नदीत पडताना पाहिली आणि तत्काळ याची माहिती पोलिसांना दिली. सकाळी सुमारे ७ वाजून ५५ मिनिटांनी आपत्कालीन नियंत्रण कक्ष रुद्रप्रयाग येथून माहिती मिळाली की, बद्रीनाथ राष्ट्रीय महामार्गावर घोलतीर जवळ एक प्रवासी बस नदीत कोसळल्याची माहिती अधिकाऱ्यांनी मिळाली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. मुख्यमंत्री धामी यांनाही या अपघाताची माहिती देण्यात आली आहे. या अपघाताच्या कारणांचा शोध घेतला जात आहे. चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली असून प्रशासनाकडून अधिक माहिती मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
या दुर्घटनेमुळे प्रशासनाने वाहन चालकांना सुरक्षा मानकांचं पालन करण्याचं आवाहन केलं आहे. तसेच या अपघातानंतर प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. प्रशासनाने या घटनेची गंभीर दखल घेतली असून अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असं आश्वासन प्रशासनाने दिलं आहे.