Cabinet decision : अहमदनगरचं नामांतर आता ‘अहिल्यानगर’ हाेणार; मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय

1
Cabinet decision

Cabinet decision : नगर :  राज्याची मंत्रिमंडळ बैठक (Cabinet decision) आज पार पडली. या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले गेले. राज्यातील काही शहरांच्या नामकरणावरही यामध्ये शिक्कामोर्तब करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Chief Minister Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत अहमदनगरचे नामकरण अहिल्यानगर असं करण्यास मान्यता देण्यात आली. तर पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव राजगड असे करण्यास मान्यता दिली आहे. शहर आणि तालुक्याशिवाय मुंबईतील ८ रेल्वे स्थानकांची ब्रिटिशकालीन नावे बदलण्यात येणार आहेत.

हे देखील वाचा : काँग्रेसच्या विनायक देशमुखांचा भाजपत प्रवेश

पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव (Cabinet decision)

राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज मोठे निर्णय घेण्यात आले. अहमदनगर शहराचं नाव ‘अहिल्यानगर’ करण्याचा राज्य मंत्रिमंडळाने घेतलेला निर्णय पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करणारा, त्यांचे विचार, कार्य, स्मृती पुढे घेऊन जाणारा, लोकप्रतिनिधींना चांगले कार्य करण्यासाठी प्रेरणा देणारा आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली आहे. या निर्णयाने अहमदनगर शहरवासियांची, जिल्हावासियांची, महाराष्ट्रातील तेरा कोटी नागरिकांची महत्वाची इच्छा पूर्ण झाली आहे. हा निर्णय होण्यात आमदार संग्राम जगताप, दत्ता भरणे, आशुतोष काळे, नितीन पवार या लोकप्रतिनिधींनी महत्त्वाची भूमिका बजावली. त्या सर्वांचे तसेच समस्त महाराष्ट्रवासियांचे मी मनापासून अभिनंदन करतो, अशा शब्दात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी निर्णयाचे स्वागत केले असून मुख्यमंत्री तसंच राज्य मंत्रिमंडळातील सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.

Cabinet decision

नक्की वाचा : संगमनेरात पुन्हा राडा; तरुणाला बेदम मारहाण

पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याचे नाव आता राजगड (Cabinet decision)


पुणे जिल्ह्याच्या वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. वेल्हे तालुक्यातल्या ज्या राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी २७ वर्षे स्वराज्याचा कारभार केला, त्या ऐतिहासिक राजगड किल्ल्याचे, स्वराज्याच्या पहिल्या राजधानीचे नाव वेल्हे तालुक्याला देण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या माध्यमातून आज घेता आला. वेल्हे तालुका आणि पुणे जिल्हावासियांची इच्छा पूर्ण करता आली, याचा मनापासून आनंद आहे, अशी प्रतिक्रिया उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली आहे.
वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्याच्या मंत्रिमंडळाच्या निर्णयामुळे श्री. अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून गेली काही वर्षे सातत्याने चालविलेल्या प्रयत्नांना यश आले आहे. वेल्हे तालुक्याचे नाव ‘राजगड’ करण्यासाठी तालुक्यातील ७० पैकी ५८ ग्रामपंचायतींचे सकारात्मक ठराव प्राप्त करुन घेणे, पुणे जिल्हा परिषदेच्या २२ नोव्हेंबर २०२१ च्या सर्वसाधारण सभेत ‘राजगड’ नावाची शिफारस मंजूर करुन घेणे, पुणे विभागीय आयुक्तांकडून ५ मे २०२२ ला तसा प्रस्ताव सादर करुन घेण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यावेळी महत्वाची भूमिका बजावली होती.

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here